Famous Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; परिवाराने लपवली निधनाची बातमी

Famous Actor Death: ‘शेरलॉक होम्स’ सिरिजमध्ये डॉ. वॉटसनची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड बर्क यांचे 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हॉलीवूडसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
actor David Burke passes away
actor David Burke passes awaySaam tv
Published On

Famous Actor Death: ‘द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ शेरलॉक होम्स’ सिरिजमध्ये डॉ. जॉन वॉटसनची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते डेव्हिड बर्क यांचे निधन झाले आहे. त्यांनी 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 10 मे रोजी त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या एजन्सीने अधिकृतपणे दिली. मात्र, त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कुटुंबाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.

डेव्हिड बर्क यांनी 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘The Adventures of Sherlock Holmes’ या लोकप्रिय मालिकेत डॉ. वॉटसनची भूमिका साकारली होती. या मालिकेतजेरेमी ब्रेट यांनी शेरलॉक होम्सची भूमिका केली होती आणि या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं. विशेष म्हणजे, डेव्हिड बर्क यांनी वॉटसनची भूमिका केवळ विनोदी साथीदार म्हणून न दाखवता बुद्धिमान, विश्वासू आणि संवेदनशील मित्र म्हणून सादर केली होती. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं होतं.

actor David Burke passes away
Famous Singer Death: संगीतविश्वाला मोठा धक्का; ज्येष्ठ गायकाचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

लिव्हरपूलमध्ये 1934 साली जन्मलेल्या डेव्हिड बर्क यांनी रंगभूमी, दूरदर्शन आणि रेडिओ अशा विविध माध्यमांत काम केलं. त्यांनी ‘Reilly: Ace of Spies’ सिरिजमध्ये जोसेफ स्टालिनची भूमिकाही साकारली होती. याशिवाय ‘किंग लिअर’, ‘मिडसोमर मर्डर्स’आणि अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

actor David Burke passes away
Ranbir Kapoor:'रामायण'च्या रिलीजआधी रणबीर झाला अयोध्यावासी; राम मंदिराजवळ खरेदी केली प्रॉपर्टी, किंमत जाणून व्हाल अवाक

शेरलॉक होम्स’ मालिकेच्या पहिल्या सीझननंतर त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे सिरिज सोडली होती. त्यानंतर एडवर्ड हार्डविक यांनी डॉ. वॉटसनची भूमिका साकारली. विशेष म्हणजे, हार्डविक यांचं नाव स्वतः डेव्हिड बर्क यांनीच सुचवलं होतं.

डेव्हिड बर्क यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. अनेकांनी त्यांना “बेस्ट डॉ. वॉटसन” असं म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अ‍ॅना कॅल्डर-मार्शल आणि मुलगा अभिनेता टॉम बर्क असा परिवार आहे. डेव्हिड बर्क यांच्या निधनाने ब्रिटिश मनोरंजनसृष्टीतील एक महत्त्वाचा अध्यायाचा शेवट झाला असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com