अनेक तरुणींचा क्रश दर्शन रावल (Darshan Raval) अखेर लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. दर्शन रावलने आजवर अनेक हिट गाणी केली आहेत. चाहते त्याच्या आवाजाचे दिवाने आहेत. दर्शनने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. दर्शनने आपल्या बेस्ट फ्रेंडशी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.
प्रसिद्ध गायक दर्शन रावलने बेस्ट फ्रेंड धरल सुरेलियाशी (Dharal Surelia ) लग्न केले आहेत. दर्शन आणि धरल अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि आता अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. दर्शनने इंस्टाग्रामवर लग्नाचे खास फोटो शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "माय बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर" दर्शनच्या या पोस्टवर सध्या चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
दर्शन आणि धरलने लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता. धरलने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. तर दर्शन ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते. त्यांच्या लग्नातील खास फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गायक दर्शन रावल 'इंडियाज रॉ स्टार सीझन 1'चा स्पर्धक राहिला आहे. त्यानंतर दर्शनने पार्श्वगायक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. दर्शनने लव्हयात्री, चोगाडा, तसेच असंख्य अल्बममध्ये भन्नाट गाणी गायली आहेत. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटात आपल्या सुपरहिट आवाजाची गाणी दिली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.