Shreya Maskar
रविवारी रात्रीच्या जेवणाला स्पेशल साऊथ इंडियन स्टाइल दही भात बनवा.
दही भात बनवण्यासाठी तांदूळ, दही, उडीद डाळ, साखर, तेल आणि डाळिंबाचे दाणे इत्यादी पदार्थ लागतात.
कढीपत्ता, लाल मिरची, मीठ, जिरे, कोथिंबीर आणि हिंग इत्यादी मसाले लागतात.
दही भात बनवण्यासाठी सर्वप्रथम भात कुकरमध्ये शिजवून घ्या.
एका बाऊलमध्ये दही, साखर आणि मीठ चांगले फेटून घ्या.
एका छोट्या पॅनमध्ये तेल तापवून त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता, उडीद डाळ आणि लाल मिरची घालून फोडणी द्या.
आता एका मोठ्या ताटात गरम भात त्यावर दही घालून मिक्स करा.
शेवटी गरमागरम भातावर फोडणी द्या.
दही भातावर वरून कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे टाका.
आंबट गोड दही भात अवघ्या १० मिनिटांत तयार झाला.