Famous Director Passes Away : प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ब्रेन स्ट्रोकशी झुंज अपयशी, मनोरंजनविश्वावर शोककळा

Marathi Famous Director Death : मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले. मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
Marathi Famous Director Death
Famous Director Passes Awaysaam tv
Published On
Summary

मराठी मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले आहे.

दिग्दर्शक खूप वेळापासून ब्रेन स्ट्रोक या आजाराशी झुंज देत होता.

मराठी मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले आहे. ज्यामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. दिग्दर्शक नितीन बोरकर यांनी काल (18 जानेवारी 2026 ) ला अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचे निधन झाले. नितीन बोरकर यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

खूप वेळापासून नितीन बोरकर यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्यावर नेरूळ येथील DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 18 जानेवारी 2026ला रविवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन बोरकर गेल्याकाही महिन्यांपासून ब्रेन स्ट्रोक या आजाराशी झुंज देत होते.

नितीन बोरकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कलाकारांनी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमांतून शोक व्यक्त केला आहे.

Marathi Famous Director Death
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घराला पहिल्याच आठवड्यात कोण करणार टाटा,बाय-बाय? रितेश भाऊंनी दिला मोठा धक्का

नितीन बोरकर यांचे काम

प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन बोरकर अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. त्यांचा साधा-भोळा स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. त्यांनी अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात 'दगडाबाईची चाळ' आणि 'मी वसंतराव' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच 'बॉडीगार्ड', 'द माइटी हार्ट’, 'आणि काय हवं' यांसारख्या चित्रपटांसाठी देखील काम केले आहे. नितीन बोरकर यांनी मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही काम केले आहे.

Marathi Famous Director Death
Komal Kumbhar : अफेअर समजताच बाप संतापला; अभिनेत्रीला पाईपनं बेदम मारलं, आता प्रियकरासोबतच करतेय सुखानं संसार, वाचा किस्सा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com