Manasvi Choudhary
तमिळ अभिनेता अभिनय यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले आहे.
अभिनय गेल्या अनेक वर्षापासून यकृत संबंधित गंभीर आजाराशी झुंजत होता.
दरम्यान उपचार सुरू असताना अभिनयची प्रकृत अचानक खालावली ज्यामुळे आज त्याचे निधन झाले.
अभिनय याच्या अचानक झालेल्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसली आहे. त्याचे चाहते देखील भावनिक झाले आहेत.
अभिनय हा तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. त्याने थुल्लुवाधो इलामाई या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली.
चित्रपटातील त्याची विष्णूची भूमिका प्रेक्षकांना आवडली. हा त्याचा पहिला चित्रपट होता.
तमिळ सिनेसृष्टीसह त्याने तेलगू आणि कन्नड चित्रपटात काम केले आहे.