Manasvi Choudhary
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे लेकीच्या साखरपुडा सोहळ्यामुळे चर्चेत आले आहेत.
इंदुरीकर महाराज यांचा चाहतावर्ग मोठा आहे त्यांनी आपल्या किर्तनामधून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं खरं नाव इंदुरीकर हे नाही आहे.
इंदुरीकर महाराज यांच्या नावामागे देखील रजंक इतिहास आहे तो सविस्तर जाणून घेऊया.
इंदुरीकर महाराज हे प्रसिद्ध किर्तनकार आहेत. संपूर्ण राज्यभर त्यांची किर्तनाची वारी सुरू असते.
इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला प्रेक्षकांची गर्दी होते. विविध सामाजिक विषयांवर ते स्पष्टपणे भाष्य करतात.
इंदुरीकर महाराज यांचे पूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे.
अहिल्यागर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्याचे गाव आहे.
इंदोरी या त्यांच्या गावावरून त्यांना इंदुरीकर महाराज हे नाव पडलं आहे जे सध्या त्याच नावाने ओळखले जातात.