Gulzar Book Launch: गजल, कविता अन् गीतांच्या पलीकडचे गुलजार समजून घेता येणार, 'धूप आने दो' पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित

Dhoop Aane Do Book Launch: प्रख्यात गजलकार-लेखक गुलजार यांच्या जीवनावरील 'धूप आने दो' या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच पार पडले.
'अनुवाद हा शब्दांचा होतो, विचारांचा नाही', गुलजार यांच्या जीवनावरील 'धूप आने दो' पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित
Gulzar Saam Tv
Published On

प्रख्यात गजलकार-लेखक गुलजार यांच्या जीवनावरील 'धूप आने दो' या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच पार पडले. मूळ मराठीत असलेल्या या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद लेखक अंबरीश मिश्रा यांनी केलाय. ऋतुरंग या मराठी दिवाळी अंकासाठी गुलजार यांनी अनेक वर्ष लिहिले. त्या मराठी लेखांच्या संग्रहाचे हे मूळ पुस्तक आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद करण्यात आल्याने इंग्रजी वाचकांना हा आठवणींचा खजाना आता उपलब्ध झालाय. याच कार्यक्रमात गुलजार म्हणाले आहेत की, अनुवाद हा शब्दांचा होतो, विचारांचा नाही.

या कार्यक्रमात बोलताना गुलजार म्हणाले की, ''अनुवाद फक्त शब्दांचा होतो, विचारांचा नाही. लोक हीच गोष्ट समजून घेण्यात चूक करतात. भाषा कोणतीही असो, सार बदलू नये.''

'अनुवाद हा शब्दांचा होतो, विचारांचा नाही', गुलजार यांच्या जीवनावरील 'धूप आने दो' पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित
Movie Release In September 2024: कंगनाचा 'इमर्जन्सी' ते जान्हवीचा 'देवरा', सप्टेंबरमध्ये 'हे' चित्रपट बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला

फाळणीच्या वेळी गुलजार यांना ज्या वेदनांना सामोरे जावं लागलं त्याचाही या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना गुलजार म्हणाले की, ''फाळणीचं दुःख मी भोगलं आहे. फाळणी कधीच नाही झाली पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की, विभागणी नेहमीच जमिनीची होते, माणसांची नाही. आजच्या काळात यावर चर्चा झाली नाही तर बरं आहे.''

गुलजार यांनी सांगितलं की, ''या पुस्तकात त्यांच्याशी संबंधित अनेक घटना आहेत. यामध्ये ते कुणालाही विशेष दर्जा देऊ शकत नाहीत. हे पुस्तक मनापासून लिहिलं गेलं आहे. '' या पुस्तकात काही दुर्मिळ छायाचित्रेही आहेत, जी गुलजार यांचा जीवनप्रवास दाखवतात. यात अशा अनेक घटनांची नोंद आहे, ज्यांनी गुलजार यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला.

'अनुवाद हा शब्दांचा होतो, विचारांचा नाही', गुलजार यांच्या जीवनावरील 'धूप आने दो' पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित
IC 814:The Kandahar Hijack: कपिल शर्माच्या शोमध्ये अपमानित होणाऱ्या अभिनेत्याची Netflix वर धूम; व्हिलेन बनत वातावरण केलं टाईट

याच पुस्तकाबद्दल बोलताना अंबरीश मिश्रा म्हणाले की, ''मराठी भाषेत सणांच्या काळात अनेक विशेषांक प्रसिद्ध होत होते. दिवाळीनिमित्त ऋतुरंग हे मासिक प्रकाशित होत होती. गुलजार साहब यांनी या मासिकासाठी ३३ वर्षे लेखन केलं आहे. त्यासाठी ते दरवर्षी एक निबंध लिहीत होते. याशिवाय इतर अनेक वैयक्तिक आणि सामाजिक घटनांबद्दल ते आपले विचार लिहीत होते. ऋतुरंगच्या संपादकाशी ते उर्दूमध्ये संभाषण करायचे. यानंतर त्यांच्या शब्दांचे मराठीत भाषांतर केलं जायचं. आता त्याचे इंग्रजीत भाषांतर झालं आहे, ज्याची जबाबदारी मी निभावली.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com