सचिन गाड/ सचिन कदम
Nitin Desai Death News Update : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडेलवाइस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे.
कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत-खालापूरजवळील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज असल्याची बाब समोर आली होती. त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का, याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू होती.
आता नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. खालापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इसीएल फायनान्स कंपनी, एडलवाइज ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 306, 34 अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीनं मानसिक छळ केल्याचा आरोप झाला होता. कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष पथक नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती.
नितीन देसाई प्रकरणात आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच एडलवाइज कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. त्यात कंपनीने सगळ्या बाजूंची सखील चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.