Nitin Desai Death: नितीन देसाईंची शेवटची इच्छा सरकार पूर्ण करणार? ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

Nitin Desai News: कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या सापडलेल्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी राज्य शासनाला एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात देऊ नका, असं आवाहन केलंय.
Nitin Desai Death
Nitin Desai DeathInstagram
Published On

Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली. नितीन देसाईंनी कर्जतच्या एन.डी. स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई यांच्या आत्महत्येनंतर झालेल्या पोलिस चौकशीमध्ये एक व्हॉईस रेकॉर्डिंग सापडली आहे.

त्या रेकॉर्डिंगमध्ये पोलिसांना काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये नितीन देसाईंनी ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ अशा आशयांचं पहिलं वाक्य बोलले आहे. सोबतच देसाईंच्या सापडलेल्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी राज्य शासनाला एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात देऊ नका, असं आवाहन केलंय.

Nitin Desai Death
Sharad Pawar Post : पावसाळ्याच्या दिवसातच त्यांचं जाणं मनाला चटका लावून गेलं, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर शरद पवार यांची भावनिक पोस्ट

नितीन देसाई त्या सापडलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात, राज्य शासनाने एन.डी.स्टुडिओचा ताबा घेऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य दिव्य स्टेज उभारावं अशी माझी इच्छा आहे. मराठी आणि बॉलिवूडमधल्या कलाकारांना अभिनयासाठी प्रोत्साहन देण्याकरिता शासनानं पुढाकार घ्यायला हवा.

कारण त्यांनी कर्जतमध्ये असलेलं एन. डी. स्टुडिओ हे नितिन देसाईंच्या नावाने नाही तर, एका मराठी माणसाने उभं केलेलं मोठं कलामंच आहे असं या ऑडिओ क्लिपमध्ये खुद्द नितीन देसाईंनीच म्हटलंय. मंगळवारी रात्री नितीन देसाई दिल्लीतून त्यांच्या कर्जतमधल्या एन.डी. स्टुडिओत परतले होते.

त्यांनी त्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये काही ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. नितीन देसाईंच्या त्या जवळपास ११ ऑडिओ क्लिप्स असून पोलिस त्या ऑडिओंचा तपास करणार आहेत.

Nitin Desai Death
Chrisann Pereira Arrest : ड्रग्स प्रकरणात अडकलेली अभिनेत्री मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार, काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, देसाई दिल्लीहून एन.डी.स्टुडिओत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला बंगल्याच्या आसपास कोणी फिरू नका, असे सांगितले. सोबतच हा माझा व्हॉईस रेकॉर्डर बहिणीकडे सोपवावा अशी माहिती कर्मचाऱ्याला दिली.

बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत स्टुडिओमध्ये कोणतीही हालचाल दिसली नाही. ज्यावेळी त्या कर्मचाऱ्याने ती व्हॉईस रेकॉर्डिंग ज्यावेळी ऐकली, तेव्हा त्याने त्यातलं पहिलं वाक्य ऐकून त्याच्या पायाखालचीच जमिन सरकली. ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ अशा आशयांचं पहिलं वाक्य त्या रेकॉर्डरमध्ये आहे. लगेचच त्या कर्मचाऱ्याने बंगल्याच्या दिशेनेही धाव घेतली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

Nitin Desai Death
Ada Sharma Health Update: अदा शर्माची अचानक तब्येत बिघडली, रूग्णालयात उपचार सुरू...

दरम्यान, नितीन देसाई यांच्या पार्थिवावर काल रात्री मुंबईतल्या जेजे रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला होता. त्यांच्या पार्थिवावर ४ डॉक्टरांच्या पथकांनी शवविच्छेदन केलं असून त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल देखील समोर आला आहे. नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला असल्याची प्राथामिक माहिती अहवालातून समोर आली आहे. दरम्यान, मुलं अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यानंतरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com