Dhurandhar 2 Box Office Collection Day 8: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाची जोरदार कमाई सुरु आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ८०० कोटींचा टप्पा पार करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.
‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, चित्रपटाने आपल्या दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच आठव्या दिवशी सुमारे ४९.७० कोटींची कमाई केली. आठवड्याच्या मध्ये कमाई थोडी कमी झाली होती. तरीही एकूण कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने प्रिव्ह्यू शोजमधूनच सुमारे ४३ कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली होती.
पहिल्या दिवशी १०२.५५ कोटींची कमाई करत चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग केली. त्यानंतर शुक्रवारी ८०.७२ कोटींचा गल्ला केला, तर शनिवार आणि रविवारी ११३ कोटी आणि ११४.८५ कोटींची कमाई करत वीकेंड गाजवला. यामुळे, ओपनिंग वीकेंडचे एकूण कलेक्शन ४५४.१२ कोटींवर पोहोचले. यासह सोमवारी ६५ कोटी, मंगळवारी ५६.६० कोटी आणि बुधवारी ४८.७५ कोटींची कमाई झाली.
आठव्या दिवसाच्या कमाईनंतर चित्रपटाची एकूण भारतातील निव्वळ कमाई सुमारे ६७४.१७ कोटींवर पोहोचली आहे. तर ग्रॉस कलेक्शनने ८०५.३२ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट लवकरच १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा चित्रपट आपल्या पहिल्या भाग धुरंधरच्या कमाईला मागे टाकणार आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने भारतात ८४०.२० कोटींची कमाई केली होती, तर त्याची जागतिक कमाई १००० कोटींच्या पुढे गेली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.