Deepika Padukone : दीपिका 'या' आजाराने त्रस्त; आजाराबाबत महत्वाची अपडेट

दीपिका पदुकोणचे मागच्या काही दिवसांपूर्वी अचानक हार्ट रेट वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती.
Deepika Padukone
Deepika PadukoneSaam Tv

मुंबई: दीपिका पदुकोणचे (Bollywood Actress Deepika Padukon) मागच्या काही दिवसांपूर्वी अचानक हार्ट रेट (Heart Attack) वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. दीपिकाने आपल्या अभिनयाची चाहत्यांवर छाप सोडली आहे. नुकतेच काही सिनेमा आणि घडलेल्या काही कॉंट्रोव्हर्सीमुळे कायमच ती चर्चेत होती. तिच्या तब्येतीत थोडे चढ- उतार आल्याने तिला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. रुग्णालयात दीपिकाच्या डॉक्टरांनी काही टेस्ट करत तिला डिस्चार्जही दिला होता.

Deepika Padukone
Adipurush teaser: प्रभासचा 'आदिपुरुष' करणार 'अधर्माचा नायनाट'; कलाकाराच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले...

दीपिकाला काही दिवसांपूर्वी हृदयाचे ठोके अचानक वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार हृदयासंबंधित आजाराचे निदान झाल्याचे बोलले जात होते. दीपिकाला पहिल्यांदाच रुग्णालयात जावे लागलेले नाही. याआधीही ती अनेकदा रुग्णालयात गेलेली आहे. दीपिकाला तो आजार 'Heart Arrhythmia'च्या लक्षणांमुळे झाला होता. मानवी हृदय विशिष्ट वेळेच्या फरकात आणि वेगाने धडकते. या वेळेत जर बदल झाल्यास त्याला हार्ट एरिथमीया म्हणतात.

Deepika Padukone
Big Boss Marathi: 'बिग बॉस'चं दार उघडलं: 'ऑल इज वेल' म्हणत झाली स्पर्धकांची एन्ट्री

साधारणत: या आजाराने माणसाला काहीही नुकसान होत नाही. जर आपल्या शरीराच्या महत्वाच्या भागात (मेंदू, हृदय, फुफ्फुस व इतर अवयव) जाणारा रक्तपुरवठा जास्त झाला तर त्याचे गंभीर परिणास होऊ शकतात. तेव्हा आपल्या आरोग्यासाठी हा आजार घातकी ठरु शकतो.

Deepika Padukone
Big Boss Marathi: 'बिग बॉस'चं दार उघडलं: 'ऑल इज वेल' म्हणत झाली स्पर्धकांची एन्ट्री

हार्ट एरिथमीयाचे लक्षण?

जेव्हा माणसाला हृदयाचे ठोके चुकणे, मान किंवा छातीत फडफड, रक्तदाब अचानक जास्त अथवा कमी होणे, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, चक्कर किंवा थकवा येणे, प्रचंड घाम येणे हे लक्षणे हार्ट एरिथमीयाचे आहेत.

हार्ट एरिथमीया आजाराची अनेक कारणे आहेत त्यात उच्च रक्तदाब, तणाव, नैराश्य, टेन्शन अथवा अॅलर्जी हे देखील हार्ट एरिथमीया आजाराची कारणे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com