प्रेमाच्या खेळात क्लिन बोल्ड! अर्शदीप सिंगनं सातासमुद्रापार गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पाहा रोमँटिक फोटो

Arshdeep Singh engagement with girlfriend Samreen Kaur : भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगने परदेशात त्याच्या गर्लफ्रेंडला रोमँटिक अंदाजात प्रपोज करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर या खास क्षणाचे फोटो शेअर करत त्याने आपल्या प्रेमाची अधिकृत कबुली दिली आहे.
Arshdeep Singh engagement with girlfriend Samreen Kaur
Arshdeep Singh engagement with girlfriend Samreen Kaur saam tv
Published On: 

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान अर्शदीपने गर्लफ्रेंड समरीन कौरसोला प्रपोज केला आहे. सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत त्याने आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची घोषणा केली.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह सध्या त्याच्या क्रिकेटमुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अर्शदीपने अभिनेत्री आणि मॉडेल समरीन कौर हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अर्शदीप गुडघ्यावर बसून समरीनला प्रपोज करताना आणि तिच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे.

Arshdeep Singh engagement with girlfriend Samreen Kaur
Famous Director Death: मराठी रंगभूमीला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अल्पशा आजाराने निधन

न्यूझीलंडमध्ये पार पडला खास मुव्हमेंट

अर्शदीपने आयुष्यातील हा खास क्षण साजरा करण्यासाठी न्यूझीलंडची निवड केली. त्याने समरीनसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंसोबत दोघांनीही भावनिक कॅप्शन लिहिले आहे. 'आयुष्य आपल्याला जे काही देऊ शकत होतं, त्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्याने आपल्याला एकमेकांची साथ दिली. आयुष्यभराच्या या सोबतीच्या नावाने...' अशा आशयाच्या कॅप्शनसह त्यांनी 11 नोव्हेंबर 2026 ही तारीख शेअर केली आहे.

अनेक महिन्यांपासून एकमेकांना करत होते डेट

अर्शदीप आणि समरीन यांच्या नात्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. सुरुवातीला अर्शदीपने एका मुलीचा हात धरलेला फोटो शेअर केला होता. मात्र, त्यावेळी त्याने त्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता.

त्यानंतर धर्मशाळेच्या रस्त्यांवर दोघेही एकमेकांचा हात धरून फिरताना दिसले होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. जुलै महिन्यात अर्शदीपने समरीनसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते.

Arshdeep Singh engagement with girlfriend Samreen Kaur
Bigg Boss 20: स्‍काउट OPला बिग बॉसने दिली मोठी शिक्षा; संपूर्ण सीझनसाठी केलं नॉमिनेट, कधीही होऊ शकतो घराबाहेर!

कोण आहे समरीन कौर?

समरीन कौर ही मनोरंजन आणि ग्लॅमर विश्वातील एक ओळखली जाणारी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने पंजाबी म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केले असून, तिच्या अभिनयाची आणि स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा असते. तिने रणवीर सिंह अभिनीत '83' या चित्रपटातही छोटी भूमिका साकारली होती. याशिवाय 'नेल पॉलिश' या वेब चित्रपटातही ती झळकली आहे. समरीनने मिस इंडिया जम्मू-काश्मीर हा किताबही मिळवला आहे. अर्शदीप आणि समरीनच्या या नव्या आयुष्याच्या सुरुवातीमुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.