Famous Director Death: मराठी रंगभूमीला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अल्पशा आजाराने निधन

Famous Director Death: बालरंगभूमीच्या माध्यमातून अनेक बालकलाकार घडविणारे प्रा. मंदार टिल्लू यांचे निधन झाले. गंधार कला संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाट्यविश्वात मोलाचे योगदान दिले आणि सांस्कृतिक वारसा निर्माण केला.
marathi children theatre director mandar tillu passes away
marathi children theatre director mandar tillu passes away Saam Tv
Published On: 

Famous Director Death: मराठी नाट्यविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बालरंगभूमीच्या माध्यमातून अनेक बालकलाकार घडविणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, निर्माते आणि गंधार कला संस्थेचे अध्यक्ष प्रा. मंदार टिल्लू यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि नाट्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बालरंगभूमीच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या जाण्याने अनेक बालकलाकारांनी आपला मार्गदर्शक गमावला आहे.

पत्नीच्या साथीने उभारली गंधार कला संस्था

प्रा. मंदार टिल्लू यांनी आपले संपूर्ण आयुष्य बालरंगभूमी आणि बालकलाकारांच्या जडणघडणीसाठी समर्पित केले होते. पत्नी पल्लवी टिल्लू यांच्या साथीने त्यांनी ठाण्यात गंधार कला संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ बालनाट्य, नाट्य प्रशिक्षण शिबिरे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मुलांमधील अभिनयकौशल्य विकसित करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना रंगमंचावर सादरीकरणाची संधी देणे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

marathi children theatre director mandar tillu passes away
Bigg Boss 20: स्‍काउट OPला बिग बॉसने दिली मोठी शिक्षा; संपूर्ण सीझनसाठी केलं नॉमिनेट, कधीही होऊ शकतो घराबाहेर!

अनेक बालनाट्यांच्या माध्यमातून बालरंगभूमी समृद्ध

मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी मंदार टिल्लू यांनी अनेक बालनाट्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. 'खेळण्यांची करामत', 'आता कसं वाटतंय', 'नाटू नाटू', 'जादूचा दिवा' आणि 'हिमगौरी आणि सात बुटके' यांसारख्या नाटकांनी बालरंगभूमीला नवी ओळख दिली. विशेष म्हणजे, पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित 'व्यक्ती आणि वल्ली' हे नाटकही त्यांनी बालकलाकारांना घेऊन दिग्दर्शित केले होते. डिजिटल माध्यमातून बालनाट्य सादर करण्याचाही अभिनव प्रयोग त्यांनी केला होता. काळानुसार रंगभूमीत बदल स्वीकारत बालकलाकारांना नवनवीन संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

marathi children theatre director mandar tillu passes away
Maatrubhumi Trailer: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर रिलीज; आर्मी यूनिफॉर्ममध्ये भाईजानचा दमदार अंदाज!

ज्येष्ठ कलाकारांच्या योगदानाचाही केला गौरव

गंधार कला संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केवळ बालकलाकार घडविण्याचे काम केले नाही, तर मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यासाठी 'गंधार गौरव सोहळ्या'ची परंपराही सुरू ठेवली. या उपक्रमातून अनेक मान्यवर कलाकारांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. याशिवाय कोकण महोत्सवासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून बोलीभाषेच्या प्रसारासाठीही ते सक्रिय होते. मंदार टिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलांनी अभिनयाचे धडे घेतले आणि रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.