Ranveer Singh: न्यूड फोटोशूट भोवणार? मनसेकडून रणवीर सिंग विरोधात तक्रार

आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरून लवकरात लवकर काढावे अशी मागणी
ranveer singh
ranveer singh Instagram

पुणे - न्यूड फोटोशूट केल्याने रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुण्यात (Pune) देखील गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेता रणवीर सिंगवर याच्या विरोधात मनसे शारीरिक सेना पुणे शहर यांच्याकडून पोलिस आयुकतालयात तक्रार करण्यात आली आहे. मनसे शारीरिक सेना, पुणे शहराचे अध्यक्ष निलेश काळे यांच्या कडून कलम 354,509,67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

सोशल मीडिया वर न्यूड फोटो प्रसिद्ध करून हिंदू संस्कृतीचा अपमान करत व स्त्रियांना फोटो पाहताना लाज वाटेल असे व तरुण वर्गाला बिघडवण्याची, त्यात वयात येणारी लहान मुले यांच्यावर वाईट संस्कार होण्याची भीती दर्शवली आहे असा आरोप मनसे कडून करण्यात आला आहे

ranveer singh
Monsoon Session : 'आप'चे खासदार संजय सिंह यांना राज्यसभेतून केले निलंबित

आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरून लवकरात लवकर काढावे अशी मागणी मनसेनेकडून करण्यात येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे अनुकरण बाकी लोक पण करू शकतील असा अंदाज वर्तवत या अभिनेत्याला चाप बसला पाहिजे अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे(Ranveer Singh) न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रचंड चर्चा होतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com