Pranit More: '370 रुपयांच्या बिर्याणी' वादात प्रणित मोरेच्या अडचणी वाढल्या; NCWच्या तक्रारीनंतर आणखी एक FIR दाखल

Pranit More 370 Biryani Controversy: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये झालेल्या ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणखी एक FIR दाखल झाली आहे.
Pranit More
Pranit MoreSaam Tv
Published On

Pranit More 370 Biryani Controversy: ‘बिग बॉस’ फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये झालेल्या ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आता प्रणित मोरेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) तक्रारीनंतर गुरुग्राम पोलिसांनी प्रणित मोरे आणि हिमांशू जांग्रा यांच्याविरोधात आणखी एक नवीन FIR दाखल केली आहे.

माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित व्हिडिओतील आक्षेपार्ह आशयाबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी प्रणित मोरे आणि हिमांशू जांग्रा यांना तपासात सहकार्य करण्यासाठी नोटीसही बजावली आहे.

Pranit More
Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; परिवाराने लपवली निधनाची बातमी, मनोरंजन विश्वावर शोककळा

याशिवाय, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना वादग्रस्त व्हिडिओ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास गुरुग्रामच्या पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम 67 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 294, 353(3), 75(2) आणि 75(3) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pranit More
Sanchita Ugale Death: 'गरज असताना कोणीही आलं नाही...' अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध अभिनेता भावूक

नेमका वाद कशामुळे सुरु झाला?

हा संपूर्ण वाद प्रणित मोरेच्या एका लाइव्ह शोदरम्यान घडलेल्या संवादामुळे निर्माण झाला. शोमध्ये प्रेक्षकांमधील हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाशी संवाद साधताना त्याच्या एका डेटचा अनुभव सांगितला. हिमांशू एका मुलीसोबत डेटवर गेला होता त्याने तिथे त्यामुलीसाठी 370 रुपये खर्च केले. याबद्दल्यात त्या मुलीने त्याची शारिरीक गरज भागवावे अशी त्याची अपेक्षा होती असे तो बोलला.या त्याच्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी, महिला संघटनांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामुळे राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांनीदेखील प्रणित मोरे, हिमांशू जांग्रा, डॉ. सेजल पवार आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com