Kapil Sharma Cafe: कॉमेडियन कपिल शर्माबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कपिलच्या कॅनडामधील कॅफेमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कपिलचा हा कॅफे नुकताच उघडण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक माणूस कॅफेच्या खिडक्यांवर गोळीबार करताना दिसत आहे. तो व्यक्ती एका कारमध्ये आहे आणि हा व्हिडिओही तिथून बनवला जात आहे.
कपिलचा हा कॅफे कॅनडाच्या सरे भागात आहे. काही दिवसांपूर्वी या कॅफेची ग्रॅन्ड ओपनिंग करण्यात आली होती. कपिलच्या या कॅफेमध्ये लोकांची मोठी गर्दीही दिसून आली होती. गोळीबाराचा हा व्हिडिओ रात्रीचा आहे, जिथे एक कारमधील व्यक्ती कॅफेच्या खिडक्यांवर गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बब्बर खालसा इंटरनॅशनल गँगने जबाबदारी घेतली
वृत्तांंनुसार, खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल गँगने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. या प्रकरणात बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेशी संबंधित दहशतवादी हरजीत सिंग उर्फ लड्डीचे नाव समोर येत आहे. लड्डी हा एक कुख्यात दहशतवादी आहे आणि त्याचे नाव यापूर्वी अनेक घटनांमध्ये समोर आले आहे. लड्डीचा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे.
तीन दिवसांपूर्वीच हा कॅफे उघडण्यात आला होता
कपिलचा कॅफे उघडून फक्त तीन दिवस झाले आहेत. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी सोशल मीडियावर कॅफेचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. कपिल शर्मा हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. अशा परिस्थितीत गोळीबारासारख्या खळबळजनक घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेकडे इशारा म्हणून पाहिले जात आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणातील सर्व माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.