Shruti Vilas Kadam
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेले सुशांत यांनी 'काय पो छे', 'एम.एस.धोनी', 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले.
'कुमकुम भाग्य' मालिकेतील भूमिकेनंतर मृणालने 'सुपर ३०', 'जर्सी' आणि 'लव सोनिया'सारख्या सिनेमांमध्ये अभिनय करून नाव कमावलं.
'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' नंतर हिना खानने 'हॅक्ड' आणि अनेक वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.
‘महाभारत’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून प्रसिद्ध झालेला शाहीर आता अनेक म्युझिक व्हिडीओ आणि फिल्म प्रोजेक्टमध्ये झळकत आहे.
'नागिन' मालिकेतील भूमिकेनंतर मौनीने 'गोल्ड', 'ब्रह्मास्त्र' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
'मेरी आशिकी तुम से ही' या मालिकेनंतर राधिकाने 'पटाखा', 'अंग्रेजी मीडियम' यांसारख्या सिनेमांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला.
टीव्ही होस्ट व अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयने 'हेट स्टोरी २' यासारख्या चित्रपटांमध्ये काम करून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.