DJ Mervin Passes Away: सिनेमॅटोग्राफर आणि डीजे म्हणून ओळखला जाणारा डीजे मर्विन यांचा उदुपीजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. वयाच्या केवळ ३५व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मर्विन हे कोंकणी आणि तुळु चित्रपटसृष्टीत लोकप्रिय होते तसेच डीजे म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती.
शनिवारी सकाळी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत कारने मंगळुरूकडे जात असताना हा अपघात घडला. कौपजवळील मूलूरू येथे रस्त्यावर अचानक कुत्रा आल्याने गाडीचालकाने ब्रेक लावला आणि गाडी पलटी झाली. या दुर्घटनेत मर्विन गंभीर जखमी झाले व त्यांना रुग्णालयात नेले गेले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. सोबत असलेले इतर सहकारी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांच्या म्युझिक व्हिडिओच्या पोस्टवर चाहते कमेंट करुन श्रद्धांजली देत आहेत एका नेटकऱ्याने लिहीले, खूप धक्कादायक बातमी. आणखी एकाने लिहीले आज त्याचा व्हिडीओ आऊट झाला आणि त्याचे निधन झाले वाटले नव्हते हा त्याचा शेवटचा व्हिडीओ ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.