Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीताच्या घटास्फोटवर वकिलाचा मोठा खुलासा; म्हणाले...

Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. या दरम्यान गोविंदाच्या वकिलांचे एक विधान समोर आले आहे.
Govinda Sunita Divorce
Govinda Sunita DivorceSaam Tv
Published On

Govinda Sunita Divorce: गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. अलिकडेच, सुनीता यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी आली होती. या बातमीने चाहते खूपच आश्चर्यचकित झाले आहेत. आता या सगळ्यामध्ये गोविंदाचे वकील ललित बिंद्रा यांचे एक विधान समोर आले आहे. ते म्हणतात की सध्या कोणताही खटला सुरु नाही.

वकिलाने सांगितले की सर्व काही ठीक आहे

एनडीटीव्हीशी बोलताना गोविंदाचे वकील म्हणाले की, 'कोणतीही केस सुरु नाही आहे त्यांच्यातील प्रकरण पुर्णपणे मिटले आहे. हे सर्व लोक जुन्या गोष्टी समोर आणत आहेत.' त्याच वेळी, असे वृत्त देखील आले की गोविंदा आणि सुनीता यांनी गणेश चतुर्थीसाठी काही माध्यमांना आमंत्रित केले आहे.

Govinda Sunita Divorce
Govinda-Sunita: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सुनीताची नवी मुलाखत व्हायरल; म्हणाली, 'गोविंदावर माझ्याइतके कोणीही प्रेम...'

गोविंदाच्या मित्राने काय म्हटले

ई टाईम्सशी बोलताना गोविंदाच्या मित्राने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले. तो म्हणाला, 'दोघेही ३८ वर्षांपासून एकत्र आहेत, इतर जोडप्यांप्रमाणे त्यांच्यातही मतभेद होतात. मला सांगा की कोणते जोडपे भांडत नाही. गोविंदा सुनीताला कधीच सोडणार नाही. ‘गोविंदाने सुनीताला सोडले तर तो संपेल. जरी प्रकरण न्यायालयात गेले तरी ते दोघेही नेहमीप्रमाणे त्यांच्यातील अंतर कमी करतील.’

Govinda Sunita Divorce
Akshay Kumar: 'तुमची खूप आठवण येईल...; पंजाबी अभिनेत्याच्या निधनानंतर भावुक झाला अक्षय कुमार, म्हणाला...

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिने गोविंदापासून वेगळे होण्यासाठी सुनीताने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तिने हिंदू विवाह कायद्याअंतर्गत क्रूरता आणि फसवणूकीचा उल्लेख केला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत मात्र अद्याप दोघांनाही या बातम्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com