Celebrity Masterchef: 'खूप छान, खूप क्रिएटिव्ह...' ; गौरव खन्नाने चोरली प्रसिद्ध मास्टरशेफची डीश; शेफकडूनच पोल खोल अन्...

Celebrity Masterchef Gaurav Khanna:'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा शेवट अगदी जवळ आला आहे आणि टॉप ५ स्पर्धक त्यांचे सर्वोत्तम सादरीकरण देण्यासाठी सज्ज आहेत. पण, गौरववर त्याने केलेली डिश चोरल्याचा आरोप आहे
Celebrity Masterchef Gaurav Khanna
Celebrity Masterchef Gaurav KhannaSaam Tv
Published On

Celebrity Masterchef Gaurav Khanna: 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा शेवट अगदी जवळ आला आहे आणि टॉप ५ स्पर्धक त्यांचे सर्वोत्तम सादरीकरण देण्यासाठी सज्ज आहेत. तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, निक्की तांबोळी, राजीव अदातिया आणि फैजल शेख हे शो जिंकण्यासाठी रिंगणात आहेत आणि त्यांच्यात कठीण स्पर्धा सुरूच आहे. नवीन भागात, सर्वांच्या नजरा गौरव खन्नावर होत्या कारण त्यांने तयार केलेल्या डीशने परीक्षक रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांना थक्क केले.

​'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या शोच्या अंतिम फेरीत अभिनेता गौरव खन्नाने जज रणवीर बरार आणि विकास खन्ना यांच्यासमोर मध असलेली एक विशेष डिश सादर केली. या डिशच्या सादरीकरणाने जज प्रभावित झाले आणि त्यांनी गौरवच्या कौशल्याचे कौतुक केले. ​

Celebrity Masterchef Gaurav Khanna
Bajrangi Bhaijaan 2: 'सिकंदर'नंतर सलमान खान पुन्हा दिसणार बजरंगीच्या भूमिकेत; लवकरच येणार 'बजरंगी भाईजान 2'

पण, सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांनी गौरव खन्ना यांनी स्विस शेफ डाइव्स जोश यांच्या डिशची नक्कल केल्याचा आरोप केला आहे. डाइव्स जोश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' चा प्रोमो शेअर करताना, 'खूप छान, खूप क्रिएटिव्ह...' असा व्यंगात्मक संदेश दिला. यानंतर, त्यांनी त्यांच्या मूळ डिशचे चित्र शेअर करून 'द ओरिजिनल' असे लिहिले. ​

Celebrity Masterchef Gaurav Khanna
Veer Murarbaji: रामायण मालिकेतील राम-सीतचे होणार पुन्हा दर्शन; 'वीर मुरारबाजी' चित्रपटात साकारणार 'या' खास भूमिका

या प्रकरणामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, काही वापरकर्ते गौरव खन्नावर टीका करत आहेत, तर काही त्यांच्या समर्थनार्थ बोलत आहेत. शोच्या निर्मात्यांनी किंवा गौरव खन्ना यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com