Bollywood Stories: बाप-लेकाच्या इमोशनल सीनमध्ये सनी देओल झाला व्याकुळ; शूटिंगदरम्यान सर्वांचे फुटले अश्रू

Bollywood Stories: आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सनी देओल एका सीनमध्ये इतके भावुक झाले की त्याला पाहून सेटवरील सर्वजण रडू लागले.
ghatak movie
ghatak movie Saam Tv
Published On

Bollywood Stories: बॉलिवूडमधील अॅक्शन आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे सनी देओलने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्याच्या अभिनयातील ताकद आणि इमोशन्स प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. मात्र, त्याच्या एका चित्रपटातील सीन इतका इमोशनल ठरला की शूटिंगदरम्यान सेटवरील सर्वजण भावूक झाले होते.

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे घातक. या चित्रपटात सनी देओलसोबत अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील एका सीनमध्ये सनी आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्यांना कॅन्सर झाल्याचे सांगतो. हा सीन अतिशय भावनिक होता.

ghatak movie
Death News: प्रसिद्ध निर्मात्यावर दु:खाचा डोंगर; अक्षय तृतीयादिवशी जवळच्या व्यक्तीचे निधन

लाईव्ह हिंदुस्तानच्या लेखानुसार, या सीनच्या आधी सनी देओल यांनी अमरीश पुरी यांना मेसेज करून तयार राहण्यास सांगितले होते. शूटिंगवेळी त्यांनी आपल्या भूमिकेत इतके रमून अभिनय केला की तो सीन अत्यंत वास्तव वाटला. शूटिंग संपल्यानंतर सनी इतका भावूक झाले की त्याला अश्रू अनावर झाले. त्याचा अभिनय पाहून सेटवर असलेले इतर कलाकार आणि टीम मेंबर्सही भावूक झाले.

ghatak movie
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' नाही 'ही' स्पर्धक मारणार बाजी

हा सीन केवळ शूटिंगपुरताच मर्यादित राहिला नाही, तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. ‘घातक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला आणि जगभरात सुमारे 26 ते 32 कोटी रुपयांची कमाई केली.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते. विशेष म्हणजे, सुरुवातीला हा चित्रपट कमल हसन यांच्यासाठी लिहिला गेला होता. मात्र, वितरकांच्या सल्ल्यानुसार सनी देओल यांची निवड करण्यात आली आणि चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात नेहमी खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या अमरीश पुरी यांनी पहिल्यांदाच सकारात्मक भूमिका साकारली होती, ज्याचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. तसेच, हा मीनाक्षी शेषाद्री यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com