FIR On ShahRukh and Deepika: बॉलिवूडमध्ये खळबळ! शाहरूख खान, दीपिका पदूकोणवर गुन्हा, कारण काय?

FIR Against ShahRukh and Deepika: शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या विरोधात राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवर ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
FIR Against ShahRukh and Deepika
FIR Against ShahRukh and DeepikaSaam Tv
Published On

Shah Rukh Khan Deepika Padukone FIR: शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या विरोधात राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंडई मोटार कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशावरून दोघांच्या नावाने एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भरतपूरमधील एका महिलेनं हुंडई कंपनीची कार खरेदी केली होती. मात्र कार घेतल्यानंतर काही दिवसांतच त्यात तांत्रिक बिघाड दिसू लागला. वारंवार तक्रार करूनही कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिलेने न्यायालयात धाव घेतली.

या खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मथुरा गेट पोलीस ठाण्यात हुंडई कंपनीचे अधिकारी, तसेच कंपनीचे ब्रँड अँबेसॅडर असलेल्या शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या नावाने ग्राहकांची फसवणूक केल्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR Against ShahRukh and Deepika
Bigg Boss 19: बिग बॉस १९ मध्ये सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या स्पर्धकांची एकूण संपत्ती

शाहरुख खान १९९८ पासून हुंडई ब्रँडचा अँबेसॅडर आहेत आणि त्याने या कंपनीच्या अनेक कार मॉडेल्सची जाहिरात केली आहे. तर दीपिका पादुकोण नुकतीच, म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये हुंडईची नवी ब्रँड अँबेसॅडर म्हणून नेमली गेली होती. त्यामुळे कंपनीची प्रतिमा उंचावण्यासाठी दोघांची जाहिरातीत महत्त्वाची भूमिका साकरली आहे. पण आता या घटनेमुळे त्यांनाही कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.

FIR Against ShahRukh and Deepika
Waterproof Makeup: पावसाळ्यात मेकअप कसा टिकवायचा? जाणून घ्या 'हे' सोपे उपाय

भारतीय कायद्यानुसार, कोणतीही सेलिब्रिटी जर एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल आणि त्या उत्पादनामुळे ग्राहकांची फसवणूक झाली असेल, तर त्या जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींनाही जबाबदार धरले जाते. याच कारणामुळे या प्रकरणात शाहरुख आणि दीपिकेची नावे गुन्हेगारी तक्रारीत आली आहेत. या प्रकरणावर भरतपूर पोलीसांनी तपास सुरू केला असून पुढील काही दिवसांत शाहरुख, दीपिका तसेच हुंडई कंपनी यांना याबाबत चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com