Dance Video : पंजाब का मुंडा अन् हॉलिवूड स्टारचा भांगडा डान्स, Diljit Dosanjh-Will Smith बेफाम होऊन नाचले

Diljit Dosanjh-Will Smith Bhangra Dance Video : दिलजीत दोसांझ आणि हॉलिवूड स्टार विल स्मिथने भन्नाट भांगडा डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Diljit Dosanjh-Will Smith Bhangra Dance Video
Dance VideoSAAM TV
Published On

आपल्या दमदार गाण्यासाठी ओळखला जाणारा दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यांना आपल्या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. दिलजीत एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्याने अनेक हिट गाण्यांसोबत चित्रपट देखील केले आहेत. दिलजीत दोसांझ कायम त्याच्या म्युझिक कॉन्सर्टमुळे चर्चेत असतो. तसेच तो जगभरात फिरत राहतो. सध्या दिलजीतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिलजीत दोसांझ हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथसोबत (will smith) भांगडा करताना दिसतोय.

दिलजीत विल स्मिथसोबतच्या व्हिडीओने चाहते भारावून गेले आहेत. या दोघांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्राम चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे आनंद घेत भांगडा (Bhangra Dance) करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिलजीतच्या डान्स स्टेप पाहत त्यावर विल स्मिथही तसाच डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला दिलजीतने एक खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "पंजाबी आ गया ओए....दिग्गज कलाकार विल स्मिथ सोबत डान्स...किंग विल स्मिथला भांगडा करताना पाहून प्रेरणा मिळाली आणि पंजाबी ढोलच्या तालावर नाचाण्याचा आनंद घेतला..."

दिलजीत विल स्मिथच्या डान्सचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जगात कानाकोपऱ्यात दिलजीतचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. दिलजीतच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. दिलजीतचे कॉन्सर्टमध्ये मराठी बोलतानाचे व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होतात.

'इश्क दा उडा अड्डा' हा दिलजीतचा पहिला अल्बम 2004 ला रिलीज झाला. या अल्बममुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. मात्र दिलजीतला इंडस्ट्रीत खरी ओळख 'गोलियां' या रॅपर हनी सिंहसोबतच्या गाण्यामुळे मिळाली. त्याचा 'गुड न्यूज' हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाने त्याला अभिनय क्षेत्रात खूप लोकप्रियता मिळवून दिली.

Diljit Dosanjh-Will Smith Bhangra Dance Video
Riteish Deshmukh Dance : 'मला वेड लावलंय...', म्हणत रितेश देशमुखनं मुलांसोबत केला जबरदस्त डान्स, जिनिलीयाच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com