Riteish Deshmukh Dance : 'मला वेड लावलंय...', म्हणत रितेश देशमुखनं मुलांसोबत केला जबरदस्त डान्स, जिनिलीयाच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष

Riteish Deshmukh Viral Video : सध्या सोशल मीडियावर देशमुख कुटुंबाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख मुलांसोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
Riteish Deshmukh Viral Video
Riteish Deshmukh DanceSAAM TV
Published On

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. रितेश आणि जिनिलीया (Genelia) बॉलिवूडची हिट जोडी आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. जिनिली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे आणि रितेश खूप मजेशीर व्हिडीओ ती शेअर करत राहते. अशात आता रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तो आपल्या मुलांसोबत भन्नाट नाचताना दिसत आहे.

रितेशने हिंदीसोबत मराठी कलाविश्वावरही आपली जादू केली आहे. त्याने सुपरहिट मराठी चित्रपट केले आहेत. त्याच्या 'वेड' चित्रपटाने तर जगाला वेड लावले. या चित्रपटातील गाण्यावर रितेश देखमुख मुलांसोबत नाचताना व्हिडीओत दिसत आहे. 'वेड' या चित्रपटातील 'मला वेड लावलंय' या गाण्यावर रितेश आणि त्याची मुलं थिरकताना पाहायला मिळाली. या गाण्यात रितेश देशमुखसोबत सलमान खान देखील पाहायला मिळाला.

व्हायरल व्हिडीओमध्ये रितेश देशमुख आपल्या दोन्ही मुलांना रियान आणि राहिल 'मला वेड लावलंय' या गाण्याची हुकस्टेप शिकवतान दिसत आहे. त्याची मुलं देखील खूप छान पद्धतीने वडिलांसारखी गाण्याची हुकस्टेप करत आहे. तर दुसरीकडे जिनिलीया या गोड क्षणाला आपल्या कॅमेरात कैद करताना दिसत आहे. रितेश आणि मुलं नाचताना जिनिलीया त्याचा व्हिडीओ काढताना दिसत आहे. रितेश आणि जिनिलीयाच्या जोडीचे कायमच कौतुक होताना पाहायला मिळते.

2022 मध्ये 'वेड' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात रितेश देखमुखसोबत जिनिलीया देखील पाहायला मिळाली. या चित्रपटाची गाणी तर आजही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. रितेश देशमुख सध्या त्याचा आगामी चित्रपट 'राजा शिवाजी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' हा चित्रपट 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या जीवनावर आधारित आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटातून रितेश देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. चित्रपटात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Riteish Deshmukh Viral Video
Akshay Kelkar : 'बिग बॉस' विजेत्याच्या घरी लगीनघाई; नुकतेच पार पडले केळवण, पाहा PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com