बॉलिवूड अभिनेता किंगखानचा जलवा आजही प्रेक्षकांना भुरळ घालतो, फक्त बॉलीवूडच नव्हे तर परदेशात ही अभिनेता शाहरुख खानचे करोडो चाहते आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची एक झलक पाहायला शेकडो फॅन्स त्याच्या घराखाली उभे असतात. यात अनेक परदेशी चाहते ही दिसून आलेत.
सोन्याच्या नाणीवर किंग खान
नुकताच पॅरिसमधील गेर्विन म्युझियमने बॉलीवूड सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानला सोन्याची नाणी देऊन सन्मानित केलं आहे.सोन्याच्या नानिवर झळकणारा हा पहिला भारतीय अभिनेता आहे. शाहरूख खान युनिव्हर्स क्लबने आपल्या ट्वीटर अकाउंटवर याबद्दलची माहिती फोटोद्वारे शेअर केली आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक किंग खानच्या सोन्याच्या नानिवरचा फोटो पाहायला मिळत आहे.
पॅरिसमधील गेर्विन म्युझियम हे ग्रँडस बुलेव्हार्ड्सवर असलेले मेणाचे संग्रहालय आहे. 2008 मध्ये इथे किंग खानचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला होता. त्याचबरोबर युके, जर्मनी, भारत, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील संग्रहालयात शाहरुख खानचे वॅक्स स्टॅच्यू आहेत.इतकेच नव्हे तर, शाहरुख खानचे वेगवेगळ्या देशात एकूण १४ स्टॅच्यू बनवण्यात आले आहे.
२०२३ मध्ये, शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना तीन मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते, पठान, डंकी आणि जवान या तीन चित्रपटाने वर्ल्ड वाइड कोट्यवधींची कमाई केली होती. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून शाहरूख खानच्या गोल्ड कॉइनवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.