Cannes Film Festival 2023: सारानं देसी लूकमध्ये केली एन्ट्री; पहिल्याच दिवशी ईशासह मानुषी छिल्लरने दाखवला बोल्डनेस तडका

Indian Actresses at Cannes Red Carpet: फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा सारा अली खानने उपस्थिती लावली होती. साराच्या लूकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या.
Cannes 2023
Cannes 2023Saam Tv

Cannes Sara Ali Khan: फ्रान्समध्ये कान्स फिल्म फेस्टिवलला सुरूवात झाली आहे. जगभरातील हॉलिवूड स्टारसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी या फेस्टिवलला हजेरी लावली. या फिल्म फेस्टिवलमध्ये चित्रपटापेक्षा सेलिब्रिटींची सर्वाधिक चर्चा होती. तसेच यावेळी रेड कार्पेटवरील अभिनेत्रींच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा सारा अली खानने उपस्थिती लावली होती. साराच्या लूकवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या. सारासह अभिनेत्री ईशा गुप्ता कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्लॅमरस अवतारात दिसली.

Cannes 2023
TDM Film New Release Date: ‘तो’ पुन्हा येतोय; भाऊराव कऱ्हाडेंचा TDM होणार रिलीज

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक भारतीय सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. 'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खान ने यावर्षी पहिल्यादांच उपस्थिती लावली. रेड कार्पेटवर सारा एथनिक लूकमध्ये झळकली. यावेळी साराच्या लूकने यंदाच्या कान्स फेस्टिवलला चार चॉंद लावले आहेत. साराने ऑफ व्हाईट डिपनेक डिझाईनर लेहेंगा परिधान केला आहे. ज्यामध्ये ती अप्रतिम दिसतेय खास कान्स फिल्म फेस्टिवलसाठी साराने हा लूक केला होता.(Latest Entertainment News)

बॉलिवूड अभिनेत्री सारा चित्रपट स्क्रिनिंगला उपस्थित होती. यावेळी सारा एथनिक लूकने साऱ्यांनाच प्रभावित केले. 'जन्नत 2' अभिनेत्री ईशाने फेस्टिवलला थाई स्लिट-कट व्हाईट गाऊन घातला आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनेही हजेरी लावली आहे. अभिनेत्रीच्या रेड कार्पेटवरील सौदर्यांने महोत्सावाची शोभा वाढवली.

Cannes 2023
Shraddha Kapoor Talk In Marathi: ‘काय कसं काय सर्व ठिक ना?...’ म्हणत श्रद्धाने केली पापाराझींची विचारपूस; अभिनेत्रीचा Video व्हायरल...

सारा आली खान, ईशा गुप्तासह अनुष्का शर्मा, मृणाल ठाकूर, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, दीपिका पदुकोण, आदिती राव हैदरी आणि प्रियांका चोप्रा देखील या फेस्टिवलमध्ये सहभागी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com