'Vedaa'चा धमाकेदार टीजर आऊट, अ‍ॅक्शन अवतारमध्ये दिसले John Abraham आणि Sharvari Wagh

Vedaa Movie: वेदा चित्रपटामध्ये जॉन अब्राहमसोबत शर्वरी वाघ आणि तमन्ना भाटिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा केल्यापासून या तिघांच्याही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती.
Vedaa Teaser Out
Vedaa Teaser OutSaam Tv
Published On

Vedaa Teaser Out:

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या त्याच्या आगामी 'वेदा' चित्रपटामुळे (Vedaa Movie) चांगलाच चर्चेत आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या सुपरहिट 'पठान' चित्रपटात जॉन अब्राहम दिसला होता. या चित्रपटानंतर चाहते त्याच्या आगामी 'वेदा' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बाटला हाऊस', 'कल हो ना हो' आणि 'सला-ए-इश्क' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या निखिल अडवाणी यांनी 'वेदा'च्या माध्यमातून चार वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

वेदा चित्रपटामध्ये जॉन अब्राहमसोबत शर्वरी वाघ आणि तमन्ना भाटिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा केल्यापासून या तिघांच्याही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अशामध्ये आता या चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा टीझर निर्मात्यांनी नुकताच रिलीज केला आहे.

निर्मात्यांनी 19 मार्चला म्हणजे 'वेद' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. यामध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ ॲक्शन अवतारात दिसत आहेत. टीझरची सुरुवात वेदा म्हणजेच शर्वरी वाघ बंडखोर बनून व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यापासून होते. वेदाला तिच्या हक्कासाठी लढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व परिस्थितीतही ती खंबीरपणे उभी राहते.

वेदाचा टीझर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. जो ॲक्शन-थ्रिलरने परिपूर्ण आहे. वेदा चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर असे दिसून येते की जॉन अब्राहम ॲक्शनच्या बाबतीत कधीही त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही. जॉनने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करताना जॉन अब्राहमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भांडण करता येत नाही मला, फक्त लढायला येते! #VedaaTeaserOutNow... १२ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.'

जॉनच्या या पोस्टला चाहत्यांकडून खूप पसंती दिली जात आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करून चाहते चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत. टीझरमध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. तर तमन्ना भाटियाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. वेदा चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, शर्वरी वाघ आणि तमन्ना भाटिया यांच्याशिवाय 'स्त्री' चित्रपटातील अभिनेता अभिषेक बॅनर्जीही दिसणार आहे. चित्रपटाची कथा असिन अरोरा यांनी लिहिली असून झी स्टुडिओ, मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी आणि जॉन अब्राहम हे निर्माते आहेत. हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी रिलीज होणार आहे.

Vedaa Teaser Out
Gharoghari Matichya Chuli: पुन्हा पुन्हा तेच तेच काही तरी नवीन आणा..., ‘घरोघरी मातीच्या चुली’चा पहिला एपिसोड पाहून प्रेक्षक संतापले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com