Jawan 6th Day Collection: फक्त भारतातच नाही तर जगभरात 'जवान'ची हवा, ६०० कोटींपार कमाई करत मोडले सर्व रेकॉर्ड

Jawan 6th Day Worldwide Collection: सहाव्या दिवशी या चित्रपटाने जगभरामध्ये ६०० कोटींपार कमाई (Jawan 6th Day Collection) केली आहे.
Jawan 6th Day Worldwide Collection
Jawan 6th Day Worldwide CollectionSaam Tv
Published On

Jawan Box Office Collection Day 6:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. 'जवान' चित्रपट (Jawan Movie) बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतच चालला आहे. दिवसेंदिवस हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. जवानची फक्त भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये हवा आहे. या चित्रपटाने जगभरामध्ये बक्कळ कमाई केली आहे. सहाव्या दिवशी या चित्रपटाने जगभरामध्ये ६०० कोटींपार कमाई (Jawan 6th Day Collection)केली आहे.

Jawan 6th Day Worldwide Collection
Satinder Kumar Khosla Death: प्रसिद्ध विनोदी कलाकार काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन

शाहरुखच्या 'जवान'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड कमाई करत आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले. गुरुवारी रिलीज झालेल्या जवानने रविवारपर्यंत चांगली कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाची कमाई सोमवारी आणि मंगळवारी कमी झाली. असे असले तरी देखील या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करुन चित्रपटाने इतिहास रचला.

'जवान' चित्रपटगृहांमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ५३.२३ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी ७७.८३ कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी ८०.१ कोटींची कमाई केली. तर पाचव्या दिवशी ३२.९२ कोटी रुपयांची कमाई केली. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'जवान' ने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी २६.५० कोटी रुपयांची कमाई केली. 'जवान'ची सहा दिवसातली एकूण कमाई आता ३४५.५८ कोटी रुपये झाली आहे.

Jawan 6th Day Worldwide Collection
Kareena Kapoor Retirement: '...अन् त्या दिवसापासून मी काम करणं सोडून देईल', करीना कपूरची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

फिल्म ट्रेड एनालिस्ट सुमित कडेल यांनी जवानांच्या वर्ल्ड वाइड कलेक्शन डे 6 ची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये चित्रपटाने मंगळवारपर्यंत जगभरात 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे त्यांनी सांगितले आहे. या चित्रपटाने दररोज सरासरी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानचा 'जवान' हा कमाईच्या बाबतीत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

Jawan 6th Day Worldwide Collection
Viral Video: ‘जवान’ पाहिल्यानंतर थिएटरबाहेर राडा, प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे मागितले परत; धक्कादायक कारण आलं समोर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com