बॉलिवूडची (Bollywood) 'बेबो' अर्थात अभिनेत्री करीना कपूर (Actress Kareena Kapoor) सध्या तिचा आगामी 'जाने जान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून करीना कपूर पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) एन्ट्री करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यग्र आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.
या चित्रपटामध्ये करीनासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करीना कपूरच्या वाढदिवसाला म्हणजेच २१ सप्टेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.'जाने जान' (Jaane Jaan Movie) रिलीज होण्याआधीच करीना कपूरने अभिनयातून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
नुकताच करीना कपूरने द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे मोठं वक्तव्य केले आहे. करीनाने सांगितले की,'ती अजूनही अभिनयासाठी खूप उत्सुक आहे. जर मी ही संधी गमावते तर मला वाटते की मी रिटायर झाले पाहिजे. कारण वयाच्या ४३ व्या वर्षीही सेटवर येण्याचा उत्साह आणि कॅमेऱ्याला सामोरे जाण्याची माझी इच्छा आहे.'
करीना कपूरने पुढे सांगितले की, ‘मला माहीत आहे की ज्या दिवशी हा उत्साह राहणार नाही. त्या दिवशी मला कळेल आणि त्या दिवसापासून मी काम करणे बंद करेन. मला प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. मी मित्रांसोबत हँग आउट करते. मला खाण्यापिण्याची प्रचंड आवड आहे, ज्या दिवशी मला वाटेल की मी तो आनंद गमावत आहे. तेव्हा मला समजेल की माझी रिटायरमेंटची वेळ आली आहे.'
करीना कपूर कोणत्या वयात अभिनयातून रिटायरमेंट घेणार? या प्रश्नाचे उत्तर देताना करीनाने सांगितले की, 'आशा आहे की वयाच्या ८३ किंवा ९३व्या वर्षी, पण मला माहित नाही! कारण मला काम करत राहायचं आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये करीना कपूरचे नाव घेतले जाते. ४३ वर्षांच्या करीनाच्या सौंदर्याचे आजही कौतुक होते. करीना कपूरने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रिफ्यूजी' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. करीना कपूर शेवटची आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसली होती. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच ती 'जाने जान' चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर तिच्या हातामध्ये हंसल मेहताचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' हा थ्रिलर चित्रपटही आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.