बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘दिल चाहता है’ फेम अभिनेता रिओ कपाडिया यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईमध्ये येत्या १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. रिओ यांनी अनेक टेलिव्हिजन मालिकेमध्ये आणि बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. रिओ कपाडिया यांनी आमिर खान, शाहरुख खान आणि राणी मुखर्जीसारख्या बड्या सेलिब्रिटींसोबत एकत्र काम केले आहे.
मित्र फैजल मलिकने रिओ कपाडिया यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, “मित्रांनो, बातमी सांगताना अत्यंत दुःख होत आहे, रिओ कपाडिया आता आपल्यात राहिलेले नाहीत. १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उर्वरित माहिती तुम्हाला त्यांच्या कुटुंबियांकडून मिळेल.”
रिओ कायमच आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष द्यायचे. अभिनेत्याला कायमच ट्रॅव्हलिंगची आवड होती. अनेकदा ते कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद लुटायला जायचे. रिओ इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय नव्हते. रिओ यांना खेळण्यामध्ये जास्त आवड होती. सोबतच त्यांना स्केचिंगचीही आवड होती. अभिनेता फारसे सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली 'मेड इन हेवन २' ही वेब सीरिज त्यांची अखेरची वेबसीरिज ठरली. याआधी २०२१ मध्ये रिओने 'द बिग बुल'मध्ये अभिषेक बच्चनसोबत प्रमुख भूमिका साकारली होती.
रिओ यांच्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, रिओ यांनी 'हॅपी न्यू इयर', 'मर्दानी', 'प्रधानमंत्री', 'हम हैं राही कर के', 'श्री', 'एक अनहोनी', 'मुंबई मेरी जान', 'मुंबई मेरी जान' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'दिल चाहता है' याशिवाय त्यांनी 'चक दे इंडिया'मध्येही काम केले आहे. याशिवाय रिओ अनेकदा टेलिव्हिजन जगतातही बरेचसे सक्रिय होते. स्टार प्लसवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका 'महाभारत'मध्ये त्यांनी पांडूची भूमिका साकारली होती. ही मालिका २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. याशिवाय 'सपने सुहाने लडकपन के'मधूनही रिओयांनी बरीच लोकप्रियता मिळवली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.