Alanna Panday Video: अनन्या पांडे होणार मावशी, बहीण अलानाच्या घरी हलणार पाळणा

Alanna Panday Pregnant: अलाना पांडे प्रेग्नेंट असून तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. अलाना पांडेने या व्हिडीओद्वारे बेबी बंप फ्लाँट केला आहे. अलानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Alanna Panday Video
Alanna Panday VideoSaam Tv
Published On

Alanna Panday:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री अनन्या पांडेची (Ananya Panday) चुलत बहीण अलाना पांडेच्या (Alanna Panday) घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अलाना पांडे प्रेग्नेंट असून तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. अलाना पांडेने या व्हिडीओद्वारे बेबी बंप फ्लाँट केला आहे. अलानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या अलानावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अलाना पांडेने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत आई होणार असल्याची गोड बातमी सांगितली. तिने पती इवॉर मॅककॅरीसोबत मॅटरनिटी व्हिडीओ शूट करत तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अलानाने बेबीबंप फ्लाँट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अलानाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही आधीपासूनच तुझ्यावर खूप प्रेम करतो. आम्ही तुला भेटण्यासाठी वाट पाहत आहोत.' अलाना पांडेच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

अलाना पांडेच्या या व्हिडिओवर नेटिझन्स जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, 'हे देवा, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. अभिनंदन.' तर शनाया कपूरने कमेंट करत लिहिले की, 'अभिनंदन.' तर सुहाना खान, तानिया श्रॉफपासून ते भावना पांडेपर्यंत सर्वांनीही अलाना पांडेला आई होणार असल्यामुळे शुभेच्छा दिल्या आहेत

अलाना पांडेने मागच्या वर्षी मार्च महिन्यात लग्न झाले होते. तिने 16 मार्च 2023 रोजी तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड इव्होर मॅककॅरीशी लग्न केले. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भारतात आल्यानंतर अलाना पांडेने प्रथेनुसार हिंदु पद्धतीने लग्न केले होते. आता लवकरच हे कपल आई-बाबा होणार आहे.

सुप्रसिद्ध डिजिटल क्रिएटर अलाना पांडे ही अनन्या पांडेच्या काकांची मुलगी आहे. अलाना पांडे ही चिक्की पांडे आणि डायना पांडे यांची मुलगी आहे. तिचा भाऊ अहान पांडे आहे. जो लवकरच बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत आहे. तर अलाना पांडे लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली आहे. चुलत बहीण अलाना पांडेच्या प्रग्नेंसीची न्यूज कळताच अनन्या पांडेही खूप खूश आहे. ती लवकरच मावशी होणार आहे.S

Alanna Panday Video
Sai Lokur: मला तुमची खूप दया येते, लज्जास्पद म्हणत सई लोकूरने वाढत्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com