Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली; 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग बंद

Amitabh Bachchan health updates : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्या लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती' KBC या शोचे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
Amitabh Bachchan health update
Amitabh Bachchan health updateSAAM TV
Published On: 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय शोचे शूटिंग सुरू असताना अचानक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली. ज्यामुळे शोचे शूटिंग काही काळासाठी थांबवावे लागल्याचे बोलले जात आहे.

८३ वर्षीय अमिताभ बच्चन आजही तितक्याच उत्साहाने आणि जोमाने काम करत आहेत. ते नियमितपणे कौन बनेगा करोडपतीच्या नवीन पर्वाचे शूटिंग करत असतात. मात्र, शूटिंगदरम्यान तब्येत अचानक बिघडल्याच्या या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. सेटवर उपस्थित असलेल्या सूत्रांनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शूटिंग काही वेळेसाठी स्थगित करण्यात आले.

Amitabh Bachchan health update
Ventilator 2: प्रियंका चोप्रा आणखी एका मराठी चित्रपटाची करणार निर्मीती; १० वर्षापूर्वीचं आहे खास कनेक्शन

याआधीही अमिताभ बच्चन यांनी अनेकदा वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक अडचणींवर मात करत आणि दुखापती असतानाही शूटिंग पूर्ण केले आहे. त्यांच्या या कामावरील निष्ठेचे आणि शिस्तीचे नेहमीच कौतुक केले जाते. मात्र, या ताज्या घटनेनंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये मोठी धाकधूक वाढली असून, सोशल मीडियावर अनेकजण ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.

Amitabh Bachchan health update
Heart Health : आरोग्याच्या दृष्टीने महिन्याला किती तेल वापरणे योग्य? जाणून घ्या

सध्या अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती किंवा हेल्थ अपडेट समोर आलेली नाही. परंतु, या वृत्तामुळे पुन्हा एकदा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.