भारतीय जेवण त्याच्या चवीसाठी जगभर पसंत केले जाते. त्यामध्ये वापरले जाणारे मसाले आणि तेल जेवणाची चव द्विगुणी करताात. भाज्यांना फोडणी देणे असो, पराठे भाजणे असो किंवा पकोडे तळणे असो, तेल प्रत्येक स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भाग आहे. मात्र, चव वाढवणारे हेच तेल जर अतिप्रमाणात वापरले गेले, तर ते हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, तुम्ही कोणते तेल वापरत आहात हे केवळ जाणून घेणे पुरेसे नाही, तर त्याचे योग्य प्रमाण समजून घेणेही महत्त्वाचे आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका सतत वाढवत चालला आहे, ज्याचे एक प्रमुख कारण आपली खाण्यापिण्याची सवय आहे. अशा वेळी कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी दरमहा अन्नात किती तेलाचा वापर केला पाहिजे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
एका संशोधनानुसार, एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात सुमारे १५ ते २० मिलीलिटर म्हणजेच ३ ते ४ चमचे पेक्षा जास्त तेल सेवन करू नये. यानुसार एका व्यक्तीसाठी महिन्यात ५०० ते ६०० मिलीलिटर तेल पुरेसे मानले जाते. मात्र, भारतीय घरांमध्ये यापेक्षा कितीतरी जास्त तेलाचा वापर केला जातो. तेलाचा वापरकर्त्यांनी महिन्याचे प्रमाण हे ५००-६०० मिलीलिटर जर घरात चार सदस्य असतील, तर एकूण २ लिटरपेक्षा जास्त तेल वापरले जाऊ नये.
बाजारात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन, खोबरेल आणि ऑलिव्ह ऑइलसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तज्ज्ञांच्या मते, मोहरीचे तेल, सूर्यफूल तेल आणि ऑलिव्ह ऑइल तुलनेने चांगले पर्याय मानले जातात.
कच्च्या घाण्याचे किंवा लाकडी घाण्याचे मोहरीचे तेल भारतीय स्वयंपाकासाठी उत्तम मानले जाते. याचा स्मोक पॉईंट जास्त असतो, त्यामुळे जास्त आचेवरही ते लवकर खराब होत नाही आणि पोषक घटक सुरक्षित राहतात.
हे कमी आचेवर किंवा सॅलडसाठी उत्तम मानले जाते. याचा कधीही डीप फ्राय करण्यासाठी वापर करू नये.
अनेक रिफाइंड तेल उच्च तापमान आणि केमिकल प्रक्रियेतून जातात, ज्यामुळे शरीरासाठी घातक ठरणारे घटक तयार होऊ शकतात. याचे सतत सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो.
आधीच हृदयविकार असलेल्या लोकांनी तेलाच्या प्रमाणावर विशेष लक्ष दिले पाहिजे. अशा लोकांनी महिनभरात ७५० मिलीलिटरपेक्षा जास्त तेल खाऊ नये. चव आणि आरोग्याचा समतोल राखण्यासाठी ८० टक्के मोहरीचे तेल आणि २० टक्के तूप किंवा बटरचे मिश्रण मर्यादित प्रमाणात वापरले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.