Taapsee Pannu Wedding: खरंच तापसी पन्नूने बॉयफ्रेंड Mathias Boe सोबत बांधली लग्नगाठ, लग्नाचा क्युट व्हिडीओ व्हायरल

Taapsee Pannu And Mathias Boe Wedding Video: तापसी पन्नूने बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत (Mathias Boe) लग्न केले. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या कपलकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
Taapsee Pannu And Mathias Boe Wedding
Taapsee Pannu And Mathias Boe WeddingSaam Tv

Taapsee Pannu And Mathias Boe Wedding:

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लगीनघाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी, क्रिती खरबंडा आणि पुलकीत सम्राट यांनी काही दिवसांपूर्वी थाटामाटामध्ये लग्ने केले. त्यांच्या लग्नानंतर आता 'डंकी' फेम अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) लग्नाची बातमी समोर आली आहे. तापसी पन्नूने बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत (Mathias Boe) लग्न केले. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या कपलकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

असा दावा केला जात आहे की, तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांनी उदयपूरमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तापसी पन्नू पंजाबी स्टाइलमध्ये नवरीसारखी नटून थटून मॅथियास बोकडे येते. मॅथियासने देखील शिख पद्धतीने लूक केल्याचे दिसत आहे. पण व्हायरल होणारा व्हिडीओ खूपच अस्पष्ट आहे. स्टेजवर उभा राहिलेल्या मॅथियासने शेरवानी घातली असून डोक्यावर पगडी बांधली आहे. या लूकमध्ये मॅथियासला ओळखणं देखील कठीण झआले आहे. तापसी पन्नू लग्नामध्ये खूपच उत्साहित दिसत आहे. नाचत नाचत ती स्टेजच्या दिशेने येते.

तापसीने अनारकली स्टाइलचा पंजाबी सूट घातला होता आणि त्यासोबत तिच्या वेणीत परंडा, हातात चुडा आणि लांबलचक कलीरे घालते होते. पंजाबी स्टाइल वधूमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथियासला वरमाला घालताना दिसत आहे. आधी तापसी मॅथियासला वरमाला घालते. त्यानंतर मॅथियास तापसीच्या गळ्यात वरमाला घालतो. तापसी भारतीय असली तरी मॅथियासने भारतीय संस्कृती ज्याप्रकारे स्वीकारली ते पाहून चाहते खूपच प्रभावित झाले.

Taapsee Pannu And Mathias Boe Wedding
Pallavi Joshi Birthday: पल्लवी जोशीच्या अभिनयाची दिग्दर्शकाने उडवलेली खिल्ली, राष्ट्रीय पुरस्कार जिंकत दिलेलं उत्तर

तापसी पन्नूने अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत पोस्ट केलेली नाही. समोर आलेल्या कोणत्याही बातमीवर आणि व्हिडीओवर तापसी पन्नू किंवा तिच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तापसीने लग्न केल्याची घोषणा न केल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांनी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केले. लग्नाला दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

Taapsee Pannu And Mathias Boe Wedding
Adah Sharma: अदा शर्माचा १५ रुपयांच्या साडीमध्ये स्टनिंग लूक, VIDEO पाहून चाहते झाले आश्चर्यचकीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com