Nora Fatehi: नोरा फतेहीसोबत 'मडगांव एक्स्प्रेस'च्या टीमने मुंबई मेट्रोत केला डान्स, VIDEO व्हायरल

Madgaon Express Movie: नोरा फतेहीचा मेट्रोत डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Nora Fatehi Dance Video
Nora Fatehi Dance VideoSaam Tv
Published On

Nora Fatehi Dance In Metro:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या तिच्या आगामी 'मडगांव एक्स्प्रेस' (Madgaon Express Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. नोरा फतेहीसह या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मुंबई मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाश्यांसोबत गप्पा मारल्या आणि त्यांच्यासोबत जबरदस्त डान्स देखील केला. नोरा फतेहीचा मेट्रोत डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

नोरा फतेही ही बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे ती तिच्या जबरदस्त डान्स आणि मू्व्ह्समुळे चाहत्यांची मनं जिंकते. काही वेळापूर्वीच 'मडगांव एक्स्प्रेस' या चित्रपटच्या टीमने मुंबई मेट्रोतून प्रवास केला. यावेळी नोरा फतेहीला प्रत्यक्षात पाहून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले. यावेळी नोराने प्रवाश्यांसोबत गप्पा मारत त्यांच्यासोबत नोरा फतेही आणि दिव्येंदू शर्मा यांच्यासह या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मेट्रोतील प्रवाशांसोबत डान्स देखील केला.

'मडगांव एक्स्प्रेस' या चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची टीम दररोज वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होताना दिसते. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नोरा फतेही मेट्रोमध्ये दिसत आहे. त्याच वेळी, संपूर्ण टीम आणि प्रवासी तिच्या भोवती उभे असलेले दिसत आहेत. यावेळी नोरा मस्ती करत नाचताना दिसत आहे. नोराला डान्स करताना पाहून इतर प्रवासी आनंदी होतात.

Nora Fatehi Dance Video
Showtime Web Series: 'शो टाईम'मधील शशांक केतकरच्या अभिनयाचे कौतुक, इमरान हाश्मीसोबत केलंय काम

नोराने फक्त तिच्या डान्सच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. अशा परिस्थितीत तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. अभिनेता कुणाल खेमूच्या दिग्दर्शनाचा हा पहिला चित्रपट आहे. बालपणीच्या तीन मित्रांच्या प्रवासाची विचित्र कहाणी चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 'मडगाव एक्स्प्रेस' 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबाबत निर्मात्यांसोबतच चाहतेही खूप उत्सुक आहेत.

Nora Fatehi Dance Video
Kiran Mane: असा नेता यापूर्वी कधी झाला नाही आणि..., शरद पवारांचा VIDEO पोस्ट करत किरण मानेंची खास पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com