हिंदी सिनेसृष्टीतून (Hindi Film Industry) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमूद (Junior Mehmood) यांचं निधन झालं आहे. ६७ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची कॅन्सरशी झुंज सुरू होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. महमूद यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली देत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक काळ असा होता ज्यावेळी फक्त ज्युनियर मेहमूद यांचे नाव खूप मोठे होते. पण कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की 'मेरा नाम जोकर', 'परवरिश', 'हाथी मेरे साथी' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या अभिनेत्याचे खरं नाव ज्युनियर मेहमूद नसून नईम सय्यद होते. नईम सय्यद यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर ज्युनियर मेहमूद हे नाव पडले. पण त्यांना हे नाव कसं मिळालं हे आपण जाणून घेणार आहोत...
अभिनेते नईम सय्यद यांचा जन्म 1956 मध्ये झाला. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांनी 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्बत जिंदगी है' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सुहाग की रात' या चित्रपटात देखील त्यांनी काम केले. या चित्रपटामध्ये नईम यांना पहिल्यांदा ज्येष्ठ अभिनेते आणि गायक मेहमूद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले.
एंटरटेनमेंट रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानंतर अभिनेते मेहमूद यांनी एकदा नईम यांना त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले होते. जिथे नईमने मेहमूद यांच्या 'हम काले हैं तो क्या हुआ...' या प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स केला. नईमचा डान्स आणि एक्सप्रेशन पाहून महमूद इतके प्रभावित झाले की त्यांनी नईम यांना 'ज्युनियर महमूद' चे टायटल दिले. त्यानंतर नईम यांनी याच नावावे आपल्या फिल्मी करिअरला पुन्हा सुरुवात केली.
ज्युनियर मेहमूद यांना पहिला चित्रपट मिळाल्याची कहाणी देखील खूपच इंटरेस्टिंग आहे. ज्युनियर महमूद यांचा मोठा भाऊ चित्रपटाच्या सेटवर फोटोग्राफीचं काम करायचा. त्यामुळे ज्युनियर महमूद लहानपणापासूनच चित्रपटाच्या सेटवर जायचे. एकदा ते भावासोबत चित्रपटाच्या सेटवर गेले होते. त्याठिकाणी एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते आणि बाल कलाकाराचा सीन शूट केला जात होता. पण बालकलाकाराला संवाद साधता आला नाही.
तेव्हा बाहेर उभ्या असलेल्या नईम यांनी 'इतना सा नही बोला नहीं रहा' अशी टिप्पणी केली. ज्युनियर महमूदकडून हे ऐकल्यानंतर दिग्दर्शक म्हणाले की, 'जर तू बोलू शकत असेल तर तुला ही संधी मिळेल.' त्यानंतर वयाच्या ९ व्या वर्षी ज्युनियर मेहमूद यांना 'मोहब्बत जिंदगी है' या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.