Singham 3: 'सिंघम 3' मध्ये अर्जुन कपूर विलनच्या भूमिकेत, खतरनाक लूक पाहून चाहते घाबरले

Arjun Kapoor Enter In Singham 3: या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) एन्ट्री झाली आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन विलनची भूमिका साकारणार असून त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अर्जुनचा खतरनाक लूक पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
arjun kapoor first look out from singham 3
arjun kapoor first look out from singham 3Saam Tv

Singham 3 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या आगामी 'सिंघम 3' (Singham 3) या चित्रपटामध्ये चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'सिंघम 3' या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ हे मुख्य भूमिकेत आहेत. यांच्याशिवाय 'सिम्बा' म्हणजेच रणवीर सिंग आणि 'सूर्यवंशी' म्हणजेच अक्षय कुमार या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार आहेत.

अशामध्ये आता या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) एन्ट्री झाली आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन विलनची भूमिका साकारणार असून त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अर्जुनचा खतरनाक लूक पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

रोहित शेट्टीचा 'सिंघम 3' चित्रपट सध्या चर्चेत आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंघम 3' चित्रपटातून आतापर्यंत अनेक स्टार्सचे लूक समोर आले आहेत. अजय देवगणपासून ते करीना कपूरपर्यंत सर्वच स्टार्सचा लूक खूपच दमदार दिसत होता. 'सिंघम 3'मध्ये काही नवीन स्टार्सही दाखल झाले आहेत. 'सिंघम ३' या चित्रपटात दीपिका पदुकोणही दिसणार आहे. याशिवाय आता या चित्रपटात अर्जुन कपूरची एंट्रीही निश्चित झाली आहे. 'सिंघम 3' चित्रपटातील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. त्याचा हा लूक व्हायरल होत आहे.

अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सिंघम 3' चित्रपटातून आतापर्यंत सर्वच स्टारचे लूक समोर येत होते. आता रोहित शेट्टीच्या या चित्रपटातील विलनचा लूकही समोर आला आहे. 'सिंघम ३'मधील अर्जुन कपूरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुन कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'सिंघम 3' मधील त्याच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये अर्जुन कपूर चेहरा रक्ताने माखलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग समोरासमोर एकमेकांकडे रागाने पाहाताना दिसत आहे. अर्जुन कपूरचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. 'सिंघम 3'मधील अर्जुन कपूरच्या लूकची चाहत्यांसोबतच ट्रोलर्सही प्रशंसा करताना दिसत आहे.

arjun kapoor first look out from singham 3
Madhuri Dixit: 'भूल भुलैया 3'मध्ये आता माधुरी दीक्षितची एन्ट्री, 'मंजुलिका'ची भूमिका साकारणार का?

'सिंघम 3'मधील अर्जुन कपूरचा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अर्जुन कपूरच्या या लूकच्या प्रेमात प्रेक्षक पडले आहेत. याचित्रपटामध्ये अर्जन कपूर विलनची भूमिका साकारणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. अर्जुन कपूरच्या या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'अशा विलनला कसं कोण घाबरू शकत नाही. याशिवाय अनेक यूजर्सनी अर्जुन कपूरला चांगला अभिनय करण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे काही लोकांनी या लुकची तुलना अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटातील लूकशीही केली.

arjun kapoor first look out from singham 3
Sangharsh Yodha Movie: 'संघर्षयोद्धा' चित्रपटाचे शूटिंग थांबवलं, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्यामुळे घेतला निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com