Arbaaz Khan Unfollow Malaika Arora: शूराशी लग्न केल्यानंतर अरबाज खानने बदलले रंग, एक्स वाइफ मलायका अरोराला केलं अनफॉलो

Arbaaz Khan And Sshura Khan Wedding: अरबाजच्या लग्नाला मलायका अरोराने हजेरी न लावता तिने आपला मुलगा अहान खानला पाठवले होते. अशामध्ये आता एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे.
Arbaaz Khan Unfollow Malaika Arora
Arbaaz Khan Unfollow Malaika AroraSaam Tv
Published On

Arbaaz Khan And Sshura Khan:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) अभिनेत्री मलायका अरोराशी (Malaika Arora) घटस्फोट आणि जॉर्जिया एंड्रियानीशी (Georgia Andriani) ब्रेकअप झाल्यानंतर नुकताच दुसरं लग्न केलं. २४ डिसेंबरला अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Sshura Khan) निकाह करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

अरबाज आणि शूराच्या निकाहच्या (Arbaaz Khan And Sshura Khan Wedding) दोघांच्याही कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. या कपलच्या निकाहचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. अरबाजच्या लग्नाला मलायका अरोराने हजेरी न लावता तिने आपला मुलगा अहान खानला पाठवले होते. अशामध्ये आता एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. अरबाज खानने त्याची एक्स वाइफ मलायका अरोराला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.

शूरा खानसोबत लग्न केल्यानंतर अरबाज खानने रंग बदलले आहेत. अरबाज खानने त्याची एक्स वाइफ मलायका अरोराला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. अरबाज खानने १९९८ मध्ये मलायका अरोरासोबत लग्न केले होते. १९ वर्षानंतर हे दोघं वेगळे झाले. ११ मे २०१७ मध्ये अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला. अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटाचे नेमकं कारण समोर आलं नव्हतं. पण मलायका अर्जुनच्या प्रेमात पडल्याने ते दोघं वेगळे झाल्याचे म्हटले जात होते. मलायकासोबत वेगळं झाल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत होता. पण काही महिन्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अरबाजने शूरा खानसोबत दुसरं लग्न केलं.

'न्यूज18'च्या रिपोर्टनुसार, अरबाज खानने शूरा खानशी लग्न केल्यानंतर मलायका अरोराला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. काही महिन्यांपूर्वी अरबाज आणि मलायका हे दोघेही एकमेकांना फॉलो करायचे. पण शूरासोबत लग्न केल्यानंतर अचानक अरबाजचे मलायकापासून दूर जाणे सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे. इन्स्टाग्रामवर अरबाज खानच्या फॉलो लिस्टमध्ये मलायकाचे नाव सर्च केल्यानंतर ती दिसत नाही. मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला असला तरी देखील हे दोघं आपल्या मुलासाठी म्हणजेच अरहानसाठी एकत्र दिलायचे. काही महिन्यांपूर्वी अरबाज आणि मलायका मुलगा अरहानसोबत हँगआउट करताना दिसले होते.

दरम्यान, मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे कपल देखील लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशामध्ये मलायकाने 'झलक दिखला जा' या कार्यक्रमादरम्यान एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तिला 'तू कधी लग्न करणार आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मलायकाने सांगितले होते की, 'जर मला लग्नासाठी कोणी विचारले तर मी नक्कीच लग्न करेल.' मलायकाच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com