क्रिती- शाहिदच्या ‘Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya’ ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम, परदेशामध्ये कमाई जोरात

TBMAUJ Day 14 Collection: शाहिद आणि क्रितीच्या ‘तेरी बातों मैं ऐसा उल्झा जिया’ची अजूनही बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. फक्त देशातच नाही तर, परदेशातही चित्रपट उत्तम कमाई करीत आहे.
TBMAUJ Box Office Collection
TBMAUJ Box Office CollectionInstagram
Published On

TBMAUJ Day 14 Box Office Collection

शाहिद आणि क्रितीच्या ‘तेरी बातों मैं ऐसा उल्झा जिया’ची अजूनही बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्हॅलेंटाईन विकमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अजूनही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाला पहिल्या आठवड्यामध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला असला तरी, दुसऱ्या आठवड्यामध्ये दिलासादायक कमाई करताना दिसत आहे. फक्त देशातच नाही तर, परदेशातही चित्रपट उत्तम कमाई करीत आहे. (Bollywood Film)

TBMAUJ Box Office Collection
Ashok Saraf: 'रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील', महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफांनी व्यक्त केल्या भावना

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टच्या माहितीनुसार, देशभरामध्ये चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये ४४. ३५ कोटींची कमाई तर दुसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रपटाने ६६ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला फक्त देशभरातच नाही तर, जगभरामध्ये उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाला जगभरामध्ये १४ दिवसांत ११० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आहे. (Bollywood News)

TBMAUJ Box Office Collection
Maharashtra Bhushan Award: अशोक सराफ हे मराठी मातीतला अस्सल हिरा: मुख्यमंत्री शिंदे

शाहिद आणि क्रितीसाठी हा चित्रपट खास ठरला आहे. कारण त्यांचे आधीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत. 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) निमित्त माणूस आणि रोबोटच्या लव्हस्टोरीवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. ही लव्हस्टोरी खरंतर शाहिद आणि क्रितीतील आहे. क्रितीने चित्रपटामध्ये एका रोबोटचे पात्र साकारले. तर शाहिदने एका वैज्ञानिकाचे पात्र साकारले. एका वैज्ञानिकाची आणि रोबोटच्या लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. (Bollywood Actor)

TBMAUJ Box Office Collection
Poonam Pandey: स्वत:च्या निधनाच्या खोट्या अफवेनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली पूनम पांडे, देसी लूकमध्ये मंदिरात केली पूजा; VIDEO व्हायरल

दरम्यान, मॅडॉक फिल्मने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील असणार आहे. त्याच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. चित्रपटातील डायलॉगसोबतच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. (Entertainment News)

TBMAUJ Box Office Collection
57th Maharashtra State Film Awards: : अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३' प्रदान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com