Gadar 2 Film Leaked: ‘गदर २’ च्या निर्मात्यांसह कलाकारांना मोठा झटका; रिलीज झाल्यानंतर काही तासातच सनी देओलचा चित्रपट लीक

Gadar 2 Film Leaked: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘गदर २’ चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.
Gadar 2 Film Online Leaked
Gadar 2 Film Online LeakedTwitter

Gadar 2 Film Online Leaked: अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ची सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाने अवघ्या दोन दिवसातच चित्रपटाच्या बजेटपेक्षा ही सर्वाधिक कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सनीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चित्रपटाची प्रतीक्षा संपली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.

Gadar 2 Film Online Leaked
Jiya Shankar Buys New Car: बिग बॉस मधून बाहेर येताच जिया शंकर झाली मालामाल; अभिनेत्रीने खरेदी केली अलिशान कार, किंमत ऐकुन थक्क व्हाल

जरी चित्रपट ऑनलाईन लीक झाला असला तरी देखील चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सध्या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक झाला आहे. सनी सिंग आणि अमिशा पटेल अभिनित ‘गदर २’ हा चित्रपट पायरसीचा शिकार झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर नक्कीच परिणाम होईल अशी भिती निर्मात्यांना वाटत असताना चित्रपटाने पहिल्या दोन दिवसातच ८५ कोटींच्या आसपास कमाई केली आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत सनी देओल, अमिशा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनिष वाधवासह अनेक सेलिब्रिटी चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित आणि निर्मित ‘गदर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ११ ऑगस्टपासून आला आहे. प्रदर्शनाआधी पासूनच या सिनेमाची चाहत्यांमध्ये क्रेझ होती. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने २० लाखांपेक्षा अधिकची कमाई केली होती. पण आता ‘गदर २’ चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल अशी भिती वाटत होती. पण चित्रपटाने फक्त २ दिवसातच बजेटचाही आकडा पार केला आहे. सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट तमिलरॉकर्स, मूवीरूल्ज, फिल्मजिला, टेलीग्राम यांसारख्या साइटवर ऑनलाइन लीक झाला आहे.

Gadar 2 Film Online Leaked
Gadar 2- OMG 2 2nd Day Collection: ‘गदर २’ ने ‘OMG 2’ ला कमाईमध्ये मागे टाकलं, सनी देओलच्या चित्रपटाची १०० कोटींकडे वाटचाल

सर्वात पहिले ‘गदर’ बद्दल बोलायचे तर, प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा पहिला भाग २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. तब्बल २२ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. ‘गदर २’ ची स्टोरी तारा सिंह आणि मुलगा चरणजीत सिंह भोवती फिरत आहे. ‘गदर’मध्ये तारा सिंह आणि सकिनाची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. पण आता ‘गदर’च्या सिक्वेलमध्ये तारा सिंह आणि सकिनाच्या मुलावर अर्थात चरणजीत सिंहवर भाष्य केले आहे. चरणजीतचे पात्र चित्रपटात उत्कर्ष शर्माने साकारला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com