

Kangana Ranaut On Nawazuddin Wife: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद सध्या बराच चर्तेत आहे. अलीकडेच अभिनेत्याच्या पत्नीने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आलियाने सिद्दीकीवर निशाणा साधला आहे.
कंगनाने नुकतीच ही पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्ट कंगना म्हणते, “हे सर्व पाहून खूप वाईट वाटतं. नवाज साहेब यांच्या घराबाहेर त्यांचाच अशाप्रकारे अपमान केला जात आहे. नवाजकडे आतापर्यंत जे काही आहे, ते सर्व त्याने त्याच्या कुटुंबाला दिले आहे. बरीच वर्ष तो मुंबईत भाड्याने राहत होता, अनेकदा तो चित्रपटाच्या शूटिंगला रिक्षाने शूटिंगसाठी यायचा. त्याने हा बंगला मागच्या वर्षीच विकत घेतला होता आणि आता त्याची पुर्वश्रमीची पत्नी तो बंगला बळकवाायला आली आहे. खूप वाईट वाटले.'
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'नवाजने आजपर्यंत जे काही मिळवले ते त्यांच्या भावांना दिले. त्याने त्याच्या पत्नीला काही दिवसांपुर्वीच घटस्फोट दिला होता. त्यासाठी त्यांनी मुंबईत फ्लॅट घेतला, त्यानंतर आईसाठी बंगला घेतला. त्यावेळी तो खूपच आनंदीत होता, त्याच्या चेहेऱ्यावर आईला घर खरेदी केल्याचा आनंदही होता. मी आत्ताच पाहिले की ती रस्त्यावर उभी राहून ती एवढ्या मोठ्या स्टारचा व्हिडीओ बनवते आहे. काय गुंडगिरी आहे, हे पाहून रडावेसे वाटते. अभिनय क्षेत्रातून पैसे कमवणे साधी गोष्ट नाही, कलाकार खूप मेहनत करतात. कलाकार मंडळी फार मेहनत घेत काम करतात. ती घर आपल्याजवळ ठेवण्याचा निर्णय कसा घेऊ शकते?'
नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ज्यामध्ये 'टिकू वेड्स शेरू', 'नूरानी चेहरा', 'बोले चुडियाँ' आणि 'अफवाह' या चित्रपटांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.