Shiv Thakare Parents Video: शिवच्या आई- वडिलांची लेकासाठी खास पोस्ट, अमरावतीतून चाहत्यांना व्हिडिओ शेअर करत केली विनंती

मराठमोळ्या शिवला जिंकविण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी देखील कंबर कसली आहे.
Shiv Thakare
Shiv Thakare Saam Tv

Bigg Boss 16 Finale: 'बिग बॉस १६'चा आज अंतिम सोहळा पार पडणार आहे. टॉप ५ स्पर्धकांपैकी कोण जिंकणार यांची सर्वांचं उत्सुकता लागली आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, शालिन भनोत आणि अर्चना गौतम हे टॉप ५ स्पर्धक आहेत. आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी प्रेक्षक तसेच स्पर्धाकांचे कुटुंबीय शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

मराठमोळ्या शिवला जिंकविण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी देखील कंबर कसली आहे. शिवच्या आई-वडिलांचा एक व्हिडिओ शिवच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडिओ शिवाच्या टीमने शेअर केला आहे.

Shiv Thakare
Pathaan Box Office Collection Day 18: शाहरुखच्या 'पठान'चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम, लवकरच पार करणार १००० कोटींचा गल्ला...

शिव प्रेक्षकांचा लाडका आहेच. पण जिंकण्यासाठी त्याला प्रेक्षकांच्या मतांची देखील गरज आहे. शिवला जिंकून देण्यासाठी अनेक मराठी सेलिब्रेटी त्यांच्यावतीने प्रेक्षकांकडे विनंती करत आहेत. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे, माधव देवचक्के, हिना पांचाळ अशा अनेक मराठी सेलिब्रिटी कलाकारांनी शिवला जिंकविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

शिव ठाकरेचे आई-वडिल या व्हिडिओमध्ये अगदी साध्या पेहराव आहेत. शिवच्या आई-वडिलांनी शिवाला वोट करा, त्याला ट्रॉफी घरून घेऊन आणायला मदत करा. अशी विनंती केली आहे. त्यांचा साधेपणा नेटकऱ्यांना भावला आहे. नेटकरी शिवाचं जिंकले जसे म्हटलं आहेत. त्यांच्या या व्हिडिओ शिवसह त्यांच्या आई-वडिलांचे देखील कौतुक होत आहे.

काही तासांनी 'बिग बॉस १६' विजेता जाहीर होईल. सर्वांचे लक्ष या शोच्या अंतिम सोहळ्याकडे लागले आहे. प्रत्येकजण त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण आपल्याला एकच विजेता मिळणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com