

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा 'धुरंधर' रणवीर सिंगच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रणवीर सिंगचे आजोबा डॉ राम हिंगोरानी यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले आहे. या बातमीची पुष्टी अभिनेत्याची चुलत बहीण सौम्या हिंगोरानी ठाकरे यांनी एका भावनिक सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.
सौम्या यांनी आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पोस्टमध्ये सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.लक्ष्मीपूजनाच्या वेळी दिवाळीच्या दिवशी तिच्या आजोबांचे निधन झाल्याचे सौम्याने उघड केले. रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण यांनी अद्याप त्याच्या मृत्यूनंतर जाहीर वक्तव्य जारी केलेले नाही.
"९६ वर्षांचा तरुण, एक गौरवशाली जीवन साजरे करण्यासाठी, शोक न करता...
माझे आजोबा, डॉ. राम, दिवाळीच्या दिवशी शांतपणे आम्हाला सोडून माझ्या आजीकडे (त्यांच्या जोडीदाराकडे) निघून गेले. त्यांनी जाण्यासाठी यापेक्षा अधिक शुभ वेळ निवडलीच नसती - दिवसाची ती सुवर्णवेळ, जेव्हा लक्ष्मीपूजन सुरू होते
मला खात्री आहे की, ते दोघे आता आपापल्या खुर्च्यांत बसून, निवांतपणे व्हिस्कीचा आस्वाद घेत, आम्हाला एकत्र पाहत असतील. जगातील सर्वोत्तम दादू , आम्हाला सर्वकाही दिल्याबद्दल धन्यवाद!
माझ्यासाठी आईस्क्रीमचा एक स्कूप ठेवून द्या
जोपर्यंत आपण पुन्हा नाचत नाही तोपर्यंत
हरी ओम"
सौम्याच्या पोस्टवर चाहते, नेटकरी आणि कलाकारांनी कमेंट्स करून आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे. आजोबांच्या अशा अचानक जाण्याने रणवीर सिंगच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 2023 मध्ये 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' च्या प्रमोशनमध्ये अभिनेत्याने आजोबांची झलक दाखवली होती. त्यावेळी डॉ राम हिंगोरानी 93 वर्षांचे होते. एका व्हिडिओमध्ये दोघे 'झुमका गिरा रे' गाण्यावर एकत्र नाचताना दिसत होते. त्याच्या आजोबांनी क्लिपमध्ये 'टीम रॉकी' टी-शर्ट घातला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.