Shamita Shetty : शमिता शेट्टी गंभीर आजाराशी देतेय झुंज, हॉस्पिटलमधून शेअर केला व्हिडीओ

Shamita Shetty Suffered Dangerous Disease : अभिनेत्री शमिता शेट्टीने इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलच्या बेडवरून एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. यामध्ये तिने सर्जरी झाल्याची माहिती दिली आहे.
Shamita Shetty Suffered Dangerous Disease
Shamita Shetty Suffered Dangerous DiseaseSaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहते. शमिता शेट्टी अनेक बॉलिवूड चित्रपटांतही प्रमुख भूमिका साकारली आहे. अशातच सध्या शमिता शेट्टी एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शमितावर एंडोमेट्रियोसिस सर्जरी करण्यात आलेली आहे. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. यामध्ये तिने सर्जरी झाल्याची माहिती दिली आहे. हॉस्पिटलच्या बेडवरूनच अभिनेत्रीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.

Shamita Shetty Suffered Dangerous Disease
Salman Khan : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला माफ करायला बिश्नोई समाज तयार, पण समोर ठेवली मोठी अट

व्हिडीओ शेअर करताना शमिता शेट्टीने कॅप्शन लिहिले की, "तुम्हाला माहित आहे का, जवळपास ४०% महिलांना एंडोमेट्रियोसिसचा त्रास आहे. आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराबद्दल माहिती नाही!!! मी माझ्या दोन्ही डॉक्टरांचे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीता वर्टी आणि माझ्या GP डॉ. सुनीता बॅनर्जी यांचे आभार मानू इच्छिते. माझ्या वेदनांचे मूळ कारण शोधून काढेपर्यंत थांबले नाही! आता माझा आजार थेरपी आणि शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला आहे. मी उत्तम आरोग्य आणि शरीर वेदनामुक्त दिवसांची वाट पाहत आहे."

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शमिता शेट्टी म्हणते की, सर्व महिलांनी कृपया एंडोमेट्रिओसिस आजाराबद्दल गुगलवर माहिती सर्च करा. आपल्याला समस्या काय आहे हे माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. शमिता शेट्टीच व्हिडीओमध्ये दिसत असून स्वत: तिने हा व्हिडीओ काढला आहे. सध्या शमिता शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल होत असून अभिनेत्रीला लवकरात लवकर बरं होण्याचा सल्ला चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी दिलेला आहे.

Shamita Shetty Suffered Dangerous Disease
Jackie Shroff News: नाव आणि फोटोचा चुकीचा वापर, जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com