शमिता शेट्टीसोबतच्या ब्रेकअपवर बिग बॉस फेम अभिनेत्यानं ट्रोलर्सना फटकारले, म्हणाला..

राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचे ब्रेकअप झाले आहे. नुकतीच एक पोस्ट शेअर करून राकेश बापटने त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर सतत त्यांना टार्गेट करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
Bigg Boss fame actor Rakesh Bapat and actress Shamita Shetty Image
Bigg Boss fame actor Rakesh Bapat and actress Shamita Shetty ImageSaam Tv

मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता राकेश बापट(Raqesh Bapat) आणि अभिनेत्री शमिता शेट्टी(ShamitaShetty) यांच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे. या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राकेश आणि शमिता दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतात. राकेश अनेकदा आपल्या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. जेव्हा या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा ट्रोलर्सने राकेशला ट्रोल करायला सुरुवात केली. राकेशने वैतागून ट्रोलर्सला चोख उत्तर दिलं आहे.

Bigg Boss fame actor Rakesh Bapat and actress Shamita Shetty Image
Alia Bhatt : आलिया भट्टला कुणीतरी करतंय 'मिस'; सोशल मीडियावरील पोस्टवर केली कमेंट

राकेश बापटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो शेअर करत एक लांबलचक कॅप्शन लिहिले आहे. राकेश बापटने या पोस्टमध्ये शमिता शेट्टीसोबतच्या ब्रेकअपनंतर विचारले जाणारे सर्व प्रश्नही नमूद केले आहेत.

राकेशने फोटोसह 'कोण कोणाला डेट करत आहे? कोण कोणाची फसवणूक करत आहे? कोणी काय परिधान केले आहे? कोणते कुटुंब चांगले आणि कोणते वाईट? माझा उद्देश काय आहे? मी राहत असलेल्या जागेत माझे योगदान काय आहे? माझी दीर्घकालीन उद्दिष्टे काय आहेत? माझी अल्पकालीन उद्दिष्टे काय आहेत? माझे उत्पन्न किती आहे? मी बचत कशी करू आणि खर्च कसा करू? मी कोणती कला शिकत राहू? मी स्वतःला कसे चांगले म्हणून सिद्ध करू शकतो? आपण स्वतःबद्दल बोलण्याचा मार्ग बदलू शकतो का? हे सगळं इतके अवघड आहे का? असे अनेक प्रश्न त्याने विचारले आहेत.

Bigg Boss fame actor Rakesh Bapat and actress Shamita Shetty Image
Ponniyin Selvan-1 : टीझर रीलीज होण्यापूर्वीच सुपरस्टार विक्रमची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केले दाखल

या पोस्टवर राकेश बापटचे चाहते आणि मित्रपरिवार त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्याची मैत्रीण आणि 'बिग बॉस ओटीटी' स्पर्धक नेहा भसीननेही कमेंट केली. नेहाने पंजाबी भाषेमध्ये लिहिले की, 'कहंदे रहंदे ने क्यूं हर वेले केहंदे रेहंदे ने मुंह विच जो आ जांदा ए बस कहंदे रहंदे ने'.

शमिता आणि राकेश यांची पहिली भेट २०२१ मध्ये आलेल्या 'बिग बॉस ओटीटी'मध्ये झाली होती. या शोदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती आणि नंतर शोमधून बाहेर पडल्यानंतर ते दोघेही एकमेकांना डेट करत होते, असे बोलले जात होते. मात्र, नंतर दोघांचाही ब्रेकअप झाल्याची चर्चा होऊ लागली. पण त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com