Pregnancy Tips : वयाची तिशी ओलांडल्यानंतर फॅमिली प्लानिंगचा विचार करताय? या ५ गोष्टी लक्षात ठेवा

Preparing for Pregnancy After 30 : देखील वयाची तिशी ओलांडली असेल आणि फॅमिली प्लानिंग करत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या जाणून घेऊया.
Pregnancy Tips
Pregnancy TipsSaam Tv

Risks of Pregnancy Over Age 30 :

दीपीका पदुकोण लवकरच आई बनणार आहे. ही गोड बातमी तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिलीये. परंतु, वयाच्या ३८ व्या वर्षी आई होताना अनेक समस्या निर्माण होतात का? फॅमिली प्लानिंग करताना पुरुषाचे आणि स्त्रीचे योग्य वय कोणते?

कामाचा वाढता व्याप, उशीरा लग्न करण्याची पद्धत यामुळे फॅमिली प्लानिंग करण्यासाठी हल्ली अनेक जोडपी उशीर करतात. तिशीनंतर आई होण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक प्रमाणात वाढले आहे. जर तुम्ही देखील वयाची तिशी ओलांडली असेल आणि फॅमिली प्लानिंग करत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या जाणून घेऊया.

1. तिशी ओलांडल्यानंतर गरोदरणात अडचणी येतात का?

वाढत्या वयाबरोबर गर्भधारणा होण्यास त्रास होतोच पण प्रसुतीनंतर अनेक धोके वाढतात. हिन्दुस्तान टाइमच्या वृत्तानुसार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल सिंघल यांनी सांगितले की, मुल जन्माला घालण्याचे योग्य वय हे २५ ते ३० वर्ष इतके आहे. वयाची ३५ शी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात.

Pregnancy Tips
Iron Deficiency : लोहाच्या कमतरतेमुळे वाढू शकतो गंभीर आजारांचा धोका! या घरगुती ड्रिंक्सचा आजचा समावेश करा

मिळालेल्या माहितीनुसार किशोरवयीन किंवा वयाची विशी ओलांडल्यानंतर महिला (Women) अधिक सक्षम असतात. परंतु ३० शी नंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. तसेच प्रजनन क्षमता देखील कमी होते. यामुळे मधुमेह (Diabetes), कमी वजनाचे बाळ (baby) तसेच सी सेक्शन डिलिव्हरी होण्याची शक्यता अधिक असते.

2. या गोष्टी लक्षात ठेवा

  • जर तुम्ही वयाची तिशी ओलांडल्यानंतर फॅमिली प्लानिंग करत असाल तर गर्भधारणा समुपदेशन करा. यामध्ये तुमचे आरोग्याची चाचणी करा.

  • गर्भधारणेमध्ये कोणतीही समस्या टाळण्यासाठी लैंगिक संक्रमित रोगांचे स्क्रीनिंग देखील केले जाते.

  • तसेच तुमच्या आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव यांसारख्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्या.

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अॅसिड सारखी प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे घ्या. रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी वजनही नियंत्रित ठेवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com