Iron Deficiency : लोहाच्या कमतरतेमुळे वाढू शकतो गंभीर आजारांचा धोका! या घरगुती ड्रिंक्सचा आजचा समावेश करा

Iron Deficiency Anemia : नियमितपणे व्यायाम, योग्य संतुलित आहार घेतल्यास आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. सध्याच्या धकाधकीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
Iron Deficiency
Iron Deficiency Saam Tv
Published On

Iron Deficiency Homemade Drink :

नियमितपणे व्यायाम, योग्य संतुलित आहार घेतल्यास आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. सध्याच्या धकाधकीचे जीवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे आरोग्याच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

सध्या २० ते ४० वयोगटातील लोकांमध्ये लोहाची कमतरता याचा समावेश अधिक प्रमाणात आहे. शरीरात लोहाची कमतरता म्हणजे रक्ताची कमतरता असणे. हे अशक्तपणाचे लक्षण असू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

रक्ताच्या कमतरतेमुळे मूळव्याध, कोलेस्टेरॉल, कॅन्सर, हर्निया, ट्यूमर, पोटाचा विकार किंवा स्त्रियांमध्ये जास्त रक्तस्त्राव यांसारख्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आहारात (Food) काही घरगुती ड्रिंक्सचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.

Iron Deficiency
Skin Care Routine : झोपताना अशी घ्या त्वचेची काळजी, हेल्दी स्किनसाठी फॉलो करा या टिप्स

1. पालकचा रस

पालकचा रस हा लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन (Vitamins) बी २, व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम यांसारख्या अनेक खनिज यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. आपल्या शरीरात लोहाचा पुरवठा करुन अशक्तपणा दूर करता येईल.

2. बीटरुट ज्यूस

बीटरुट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये लोहाचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर करता येते. बीटरुटमध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, जीवनसत्त्व आणि खनिजांसह पोषक तत्वांचे भांडार आहे. याच्या सेवनाने कोलेस्टेरॉलपासून संरक्षण होते.

Iron Deficiency
Breakfast Recipe : बेसन आणि रव्यापासून बनवा टेस्टी व्हेज टिक्का, पाहा रेसिपी

3. सीताफळचा ज्यूस

सीताफळ हे अँटिऑक्सिंडंट्सचा खजिना आहे. लोहही मुबलक प्रमाणात आढळते. याच्या नियमित सेवनाने लोहाची कमतरता याच्या रसाने दूर करता येते. अशक्तपणा दूर करण्यासाठी सीताफळ फायदेशीर (Benefits) ठरते. बद्धकोष्ठता आणि दम्यासारख्या समस्यांवर देखील मात करता येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com