Rakhi Sawant : "आपण सगळे काश्मीरला जाऊ...", राखी सावंतनं प्लान केली ट्रिप, VIDEO शेअर करत चाहत्यांना दिलं आव्हान

Pahalgam Terror Attack: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने काश्मीरमध्ये जाण्याचे आव्हान चाहत्यांना दिलं आहे.
Pahalgam Terror Attack
Rakhi SawantSAAM TV
Published On

22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे हल्ला करण्यात आला. यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. सामान्यापासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण यावर बोलताना दिसत आहेत. लोक आपला राग व्यक्त करत आहे. आता यावर राखी सावंतने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant ) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

राखी सावंतने व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना काश्मीर जाण्याचं आवाहन केले आहे. व्हिडीओमध्ये राखी बोलते की, "सलाम वालेकुम सभी को, नमस्ते, जय भारत, जय भीम, जय हिंदुस्तान, भारत माता की जय. आता तुम्ही आनंदी आहात ना? आपण सर्व एक आहोत. आपल्या हिंदुस्तानातून मुस्लिमांना कोणी बाहेर काढू शकत नाही. जेवढा भारत हिंदूंचा आहे. तो तेवढाच मुस्लिम लोकांचा देखील आहे. सारखे हिंदू-मुस्लिम असं करू नका."

पुढे राखी सावंत म्हणाली की, "लहान मुलासारखे वागू नका...मोठे व्हा आणि देवावर दया करा. देवाला त्रास होतो की, यांना मी बनवले आहे. हे सर्व माझी मुलं आहेत. का भांडत आहेत? यांना काय पाहिजे? मी पुढच्या सुट्टीत काश्मीरला जाणार आहे.आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की आपण काश्मीरला जावे. काश्मीर आपलं आहे. काश्मीरी लोक आपले भाऊ-बहिण आहेत. काश्मीर आपले पर्यटन आहे. शपथ घ्या... सुट्टीत काश्मीरला जाणार भारताच्या बाहेर जाणार नाही."

शेवटी राखी सावंत म्हणाली की, "मी काश्मीरला जाणार आहे, तुम्ही मला साथ देणार का? त्या सर्वांनी आपला जीव गमावून आपल्याला वाचवले आहे. ज्याप्रमाणे सैनिक देशासाठी आपला जीव गमावतात. तसेच काश्मिरी लोकांनी देखील आपला जीव गमावला आहे. घाबरू नका... आपण सगळेजण काश्मीरला जाऊ. मी तुमच्याबरोबर येईन, संपूर्ण बॉलिवूड तुमच्यासोबत येईल. कोण-कोण माझ्याबरोबर येणार?" राखी सावंतने बुरखा घालून व्हिडीओ शेअर केला आहे.

Pahalgam Terror Attack
Zapuk Zupuk vs Devmanus : सूरजच्या 'झापुक झुपूक'नं 'देवमाणूस'ला टाकलं मागे, दुसऱ्या दिवशी किती कमावले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com