
New Announcement In Rakhi And Aadil Khan: अभिनेत्री राखी सावंत आपल्या वादग्रस्त विधानांनी बरीच चर्चेत असते. सोशल मीडियावरील राखीचे हटके फोटो किंवा व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. तिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत बऱ्याचदा आदिल खानही असतो. व्हिडिओमुळे राखी़सोबत आदिलही ट्रोल होतो.
राखी आणि आदिल अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहे. राखी आणि आदिलची त्यांच्या व्हिडिओमुळे आणि रिलेशनशिपमुळे चर्चा होते. ही आतरंगी राखी त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली असून त्याच्या सोबत विचित्र गोष्ट करताना दिसते. कधी त्याच्यावर फुलाचा वर्षाव करते तर कधी भेट होणार म्हणून आपला लुकच बदलते.
नेहमीच एकमेकांसोबत दिसणारी राखी कधी लग्न करणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. त्यातच आता राखी- आदिलच्या लग्नाची नवीन माहिती मिळालेली आहे. नुकताच राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यात ती एका हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसून येत आहे. त्या व्हिडिओत राखी म्हणते, “आज आम्ही सेलिब्रेशन करत आहोत. कारण मी आणि आदिल एक खूप चांगली नवीन वेब सिरिज एकत्र करणार आहोत.” राखीसोबतच आदिलही ही आनंदाची बातमी चाहत्यांना देताना दिसतोय.
आदिल आणि राखीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा बरीच होत असून चाहत्यांनी त्या व्हिडिओवर भरभरून कमेंट केल्या आहेत. यापूर्वी राखी आणि आदिल एका गाण्यामध्ये दिसले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. या वेबसीरिजबद्दल माहिती अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. लवकरच वेबसीरिज बद्दल माहिती प्रेक्षकांना कळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.