Nora Fatehi Fashion: नोराच्या फॅशनचा मोठा तोरा, ड्रेस आणि हॅंड पर्सची किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Nora Fatehi Expensive Outfit: ‘हौशेला मौल नसतं’ ही म्हण सध्या नोरा तिच्या रियल आयुष्यात जगतेय.
Nora Fatehi Expensive Dress And Hand Purse Prizes
Nora Fatehi Expensive Dress And Hand Purse PrizesSaam Tv
Published On: 

Nora Fatehi Expensive Dress And Hand Purse Prizes: ‘हौशेला मौल नसतं.’ या म्हणीचा प्रत्यय एका बॉलिवूड अभिनेत्री सोबत आला आहे. आपल्या कातील अंदाजातील डान्स मुव्हजने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या नोराची सध्या तुफान चर्चा आहे. यावेळी नोरा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीय. यावेळी तिच्या फॅशन सेन्सने अभिनेत्री चर्चेत आली असून तिच्या कपड्यांनी आणि एका हँड बॅगने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.

Nora Fatehi Expensive Dress And Hand Purse Prizes
Neena Gupta- Angad Bedi Romance: ‘भविष्यात मला नीना गुप्तांसोबत रोमान्स...’ म्हणत अंगद बेदीने व्यक्त केली मनातली इच्छा

सध्या नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील ड्रेसने आणि एका बॅगने चाहत्यांचे लक्ष वेधले. नोराच्या ड्रेस आणि बॅगची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

नोराने व्हाइट जॅकवर्ड क्रॉप टॉप आणि मिनि स्कर्ट घातला आहे. पिंकविलाने दिलेल्या माहितीप्रमाणे, या को-ऑर्ड सेटची किंमत २ लाखांपेक्षा जास्त असून नोरा फतेहीच्या हातात लोटस पर्लसेंट केज लॅम्बस्किन मिनी लेडी डायर बॅग हातात घेतली आहे. नोराच्या या बॅगची मत जवळपास ४ लाख ३४ हजार रुपये इतकी आहे.

नोराच्या फॅशनची चर्चा नेहमीच होत असते. अनेकदा तिच्या फॅशनची कॉपी अनेक बॉलिवूड अभिनेत्री देखील करत असतात. नोराने ‘दिलबर दिलबर’, ‘हाय गर्मी’, ‘कमरिया’ या आणि अशा अनेक गाण्यांतून आपली ओळख निर्माण केली आहे.

Nora Fatehi Expensive Dress And Hand Purse Prizes
Ranveer Singh Struggle : स्ट्रगलर ते सुपरस्टार ; बॉलिवूडच्या बाजीराव कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक

नुकताच सोशल मीडियावर नोराचा ‘छोड देंगे’ हा म्युजिक अल्बम व्हिडीओ प्रदर्शित झाला. यातील नोराची डान्स मुव्हस, तिचा कातिल करणारा लूक आणि दिलखेचक अदांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. तिच्या या गाण्याला युट्यूबवर १३ कोटी इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com